माळशिरस तालुका -प्रतिनिधी
रशिद शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आज अयोध्या नगरी येथे प्रभु श्रीराम मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळा चे औचित्य साधून पिलीव तालुका माळशिरस येथे आनंद उत्सवरुपी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या रथयात्रेनिमित्त पिलीव येथे हिंदू समाज बांधवांना मुस्लिम समाज बांधवांनी शुभेच्छा देऊन मुस्लिम समाज यांच्या वतीने जिलेबी वाटप करण्यात आले याप्रसंगी पिलिव चे लोकनियुक्त सरपंच नितीन मोहिते, पिलीव भाजपा शहराध्यक्ष राजाभाऊ करांडे, पत्रकार --प्रमोद भैस ,मुस्लिम समाज चे जेष्ठ नेते अरिफखान पठाण ,अफजलखान पठाण, इसाकभाई बागवान, जमीर तांबोळी' नटवर पठाण ,कदिर पठाण ,आयाज पठाण ,अरमान शेख ,सोहेल काझी, अमन सय्यद, अमिर शेख, राज पठाण, साबीर सय्यद ,रसुल मुजावर, निसार मुलाणी ,अशपाक बागवान , हासिम पठाण, आदी समाज बांधव उपस्थित होते




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा