Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

सरकारी शाळेत कोचिंग क्लास प्रमाणे शिक्षण का नाही? व्यवसायभिमुख आधुनिक शिक्षण काळाची गरज--इक्बाल मुल्ला.सांगली...

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो.--9730 867 448*

             नर्सरी ते 10 वी पर्यंत एका विद्यार्थ्याला ज्या भारतात पाच लाख रुपये खर्च येत असेल , ज्या भारतात 1 ली पासून 10 वी*आणि त्यानंतर उच्चशिक्षणासाठी खाजगी कोचिंग क्लास वर विद्यार्थी विसंबून असेल ,ज्या भारतात केवळ शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज काढावे लागत असेल आणि विद्यार्थ्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे कंगोरे आणि त्याची वैशिष्ठे न पाहता पास हा "शिक्का" मारला जातो , त्या भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये आज आमूलाग्र बदल करण्याची नितांत आवश्यकता भासत आहे .

फक्त पास -नापास हा निकष लावून एखाद्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता व निपुणता "पारखली" जात असेल तर सांगली मधील "4 थी पास" असणारे कर्तृत्वसंपन्न आणि धडाकेबाज व्यक्तिमत्व - उतुंग राजकारणी स्व . वसंतदादा पाटील हे 5 वेळा मुख्यमंत्री झाले नसते .प्रचंड कष्ठातून , इच्छाशक्तीतून भारतात शेकडो लखपती ,"करोडपती" जन्माला आले नसते .

  नगरपालीका शाळेत शिकूनचं हजारो जिल्हाधिकारी ,आय .पी ऐस! 

भारत देश स्वतंत्र झाल्यापासून 2024 सालापर्यंत नगरपालिकेच्या शाळा अस्तित्वात आहेत .त्याच शाळेत शिकून हजारो लोक डॉक्टर , वकील , आर्किटेक , जिल्हाधिकारी ,आणि पोलीस अधीक्षक बनले. मग आज असे काय झाले की नगरपालिकेच्या शाळा ओस पडत आहेत?? आणि सर्व विद्यार्थी खाजगी शाळेत जात आहेत ??? आधुनिक शिक्षण पद्धतीनींसार "परिपूर्ण" सरकारी शिक्षणचा अभाव आहे का ??



जगातील केवळ 55 लाख लोकसंख्या असणारा फिनलँड हा युरोपातील एक देश आहे. परंतु जगात हा देश शिक्षणात सर्वोत्तम आहे .कारण या देशात "पास - नापासांची "स्पर्धा नाही .भारतातील शिक्षण हें ज्युनियर के .जी पासून सुरु होते .तेथे 30,000 रुपये फी पालकांना भरावी लागते . मग सरकारी शाळांमधून उच्च दर्जाचे हेच शिक्षण का मिळत नाही ?? लहान मुलगा उच्चशिक्षण पूर्ण करेपर्यंत 10 ते 15 लाख रुपये खर्च होतात .हा खर्च करेपर्यंत पालकांचे कंबरडे मोडते . जर नगरपालिका -महापालिका शाळेमध्ये मोफत आणि उच्च दर्जाचे शिक्षण मिळाल्यास प्रत्येक पालकांचे , त्यांच्या एका मुलाचे 15 लाख रुपये वाचू शकतात .

   ]1 ली ते 12 वी शिक्षणाचा "जॉब"/बिझनेस साठी उपयोग होतो का ???

1 ली ते 12 वी पर्यंत च्या शिक्षणामध्ये "अभ्यास" करून करून मुले दमतात . कित्येक मुलांना अभ्यासाचे टेन्शन सहन होत नाही .वास्तविक इतका खटाटोप करून,अभ्यास करून,कष्ट करून शिकलेल्या अभ्यासाचा काडीमात्र उपयोग कालांतराने होत नाही . इतकी क्लिष्ट आणि "किचकट" गणिते असतात .परंतु त्या गणिताचा वापर भविष्यात कधीही करावा लागत नाही . जर नोकरीसाठी - व्यवसायासाठी उपयोगी पडणारा अभ्यास नसेल तर विद्यार्थ्यांना "काथ्याकूट" करायला का लावता ??? जो अभ्यासक्रम कधीही भविष्यात उपयोगी पडत नाही ,तो अभ्यासक्रम घेऊन काय फायदा ??? केंद्रसरकारने याबाबत विचार करून व्यवसायभिमुख अभ्यासक्रम निर्माण करावा ! 

   मोफत शिक्षण हा जन्मसिद्ध हक्क हवा !

विद्यार्थ्यांचे पालक स्वतःचा उदरनिर्वाह करेपर्यंत "कासावीस" होतात . विद्यार्थ्यांना उच्चदर्जाचे शिक्षण ,शैक्षणिक स्तर उंचावलेले शिक्षक ,याच्या माध्यमातून भारतातील सर्व विद्यार्थ्यांना "मोफत शिक्षण" का मिळू शकत नाही ???

गुजरात मधील गोदी भक्त हजारो कोटी ची "लूट" करून फरार होतात ,देश सोडतात . त्यांचे पैसे सोडण्यासाठी सरकारकडे पैसा आहे परंतु सरकारकडे मोफत शिक्षणासाठी पैसा नसावा ???

शिक्षणाने सर्वांगीण "प्रगती" होत असेल तर सर्वांना मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे .

अन्य देशात देशात शिक्षण पूर्णपणे मोफत असून ते सर्वांसाठी सहजसाध्य असते. भारतात ,शाळेकडून किंवा कॉलेज कडून प्रत्येक विद्यार्थ्याला लागणारी सर्व पुस्तकं आणि लागणारं सर्व शैक्षणिक साहित्य मोफत का दिलं जातं नाहीत ???

अन्य देशातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयं तिथलं सरकार चालवतं आणि सर्व खर्च सरकार उचलतं. खाजगी शाळेची कमतरता भासू नये ,इतके चांगले शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे. 

   बालपण जगून घेण्यासाठी सात वर्ष मनसोक्त जगू द्यावे! 

4 वर्षांपासून मुलांना सांभाळण्यासाठी परदेशात सरकारी संस्था असतात. पण तिथंही मुलांना "पुस्तकी" शिक्षण दिलं जात नाही. तिथं त्यांना खेळणं, मोकळेपणानं जगणं, इतरांशी मैत्री करणं, नवे मित्र मिळवणं, सहकार्याची भावना निर्माण करणे या गोष्टी शिकवल्या जातात . नवनवीन खेळाची माहिती दिली जाते . आपल्या भारतात देखील असे स्वछंदी शिक्षण देणे शक्य नाही का ?? भारतातील खेळ आणि भारतीय संस्कृती याबद्दल विध्यार्थ्यांना ज्ञान मिळणे गरजेचे आहे .पाश्चिमात्य देश आपल्यापेक्षा 5 वर्षानी पुढे का आहेत याची कारणमीमांसा व्हायलाच हवी .

पटसंख्येवर नियंत्रण हवे!

भारतात लहान मुलांना शाळेत 40 च्या वर पटसंख्या असते .विद्यार्थी कमी असतील तर शिक्षकांनी शिकवलेला विषय आणि त्याचा संदर्भ याचे आकलन होते .

उत्कृष्ठ अभ्यासासाठी फक्त वीस मुलांना एका वर्गात ठेवले ??? केवळ 20 मुलांचा पट केला तर ??? शिक्षक मुलांवर लक्ष्य केंद्रित करतील आणि विद्यार्थी देखील मन लावून अभ्यास करतील .भारतातील शिक्षणमंत्री याबाबत विचारविमर्श करतील का ???

   खाजगी क्लासेस वर बंधन हवे का ??

वास्तविक शाळेत चांगल्या पद्धतीने शिक्षण दिले गेले असते तर खाजगी शिक्षक आणि क्लासेस निर्माण झाले नसते . शाळेत असणारे शिक्षक आणि खाजगी क्लासवाले यांच्यात सेटलमेंट असते का ?? कारण खाजगी क्लास ला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा अलीकडे फार वाढला आहे . शाळेतील विषय जितक्या गांभीर्याने खाजगी कोचिंगवाले शिकवतात ,तितक्याच प्रामाणिकपणे सरकारी शाळेतील शिक्षक का शिकवू शकत नाहीत ??? सरकारी नोकरदार पगार घेत नाहीत का ?? सरकारी शिक्षकाला 50,000 च्या वर पगार असेल तर त्या पगाराला तो न्याय देतो का ??? शाळेची वेळ केवळ 4 तास असावी .!

 पाश्चिमात्य शाळेप्रमाणे भारतात शाळेचा वेळ अगदी कमी असावा . दिवसातले फक्त चार तास ! मुलांना गृहपाठ अजिबात दिला जाऊ नये . वास्तविक मुलांनी आपल्या घरी "अभ्यास" करावा.

भारतात 8 तास विद्यार्थी शाळेत जातो . जेंव्हा घरी येतो तेंव्हा डोक्यात "अभ्यासाचे टेन्शन घेऊन आलेला असतो . शाळेत अभ्यास ,घरी अभ्यास ,यामुळे मुलांची विचारक्षमता क्षीण होत नसेल का ..? त्याच्या मेंदूला ताण येत नसेल का ?? कित्येक मुले अभ्यासाच्या ताणामुळे आत्महत्या करतात .याला जबाबदार कोण ???

   मुलाला " शिक्षित" नव्हे तर सुशिक्षित बनवा! 

मंद विद्यार्थी देखील भविष्यात हुशार मुलाला कामाला ठेवू शकतो .शाळेमध्ये पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष जगण्यातल्या आणि "व्यवहारीक" आणि भविष्यात व्यवसायभिमुख निर्माण करणाऱ्या गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत .नाविण्य आणि आधुनिक शिक्षणपद्धती मुलांना शिक्षित बनवत नाही, तर "सुशिक्षित" बनवते आणि त्याबरोबर प्रत्येक मूल कसा आदर्श मनुष्य बनेल हेही शिकवायला हवेत! गणित आणि विज्ञाना बद्दल पुस्तके निर्माण करायला पाहिजेत . त्यातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे .जगाबरोबर आपण आहे का याचादेखील विचार करायला हवा.

   हा वर्ग नव्हे तर "आनंद" सोहळा ! 

शाळेत मुलांना वेळेचं बंधन नसावे . वर्गातल्या अभ्यासाचे तासही बंधनकारक नसावा. कॉलेज प्रमाणे त्याला बसायचं असेल तर बसेल अन्यथा बाहेर जाईल .वर्गाच्या बाहेर खेळावं.सर्व प्रत्येक वर्गात दर पंचेचाळीस मिनिटांनंतर मुलांना पंधरा मिनिटांची सुट्टी दिली जावी . मुलं याच वेळात खेळू शकतात. हवं ते करू शकतात .यामुळे शिक्षक मुलांचे चांगले मित्र बनतात. खरंचं भविष्यात अशी शाळा आणि शिक्षक भारतात होतील का ??? आधुनिक शिक्षण पद्धती भारतात राबवली जाईल का .??? सरकारी शाळेचे उदात्तीकरण होईल का ?? विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का ???

 "इकबाल बाबासाहेब मुल्ला" "

( पत्रकार) 

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज ,

सांगली .

मोबाईल - 8983587160

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा