Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

*भारताबाहेर बुद्धांचे नाव घेऊन प्रतिमा उंचावणारे- पंतप्रधान 'नरेंद्र मोदी ' प्रत्यक्षात भारतात मात्र "बुद्ध तत्त्वज्ञान "विसरतात*

 


*श्रीपूर --बी.टी.शिवशरण*

            जगाला शांतीचा समतेचा अहिंसेचा संदेश देणारे थोर महाकारुणीक तथागत गौतम बुद्ध यांचा विचार संपूर्ण जगाने मान्य केले आहे सर्व जगात बुद्ध तत्वज्ञान पोहचले आहे त्यामुळे भारताची परंपरा व अभिमान वाटावा असा संदेश त्यांचा प्रसार प्रचार जगात झाला आहे जगातील कोणत्याही शहरात गावात बुध्द अवशेष सापडले आहेत भारतात बुध्दाच्या मुर्ती तोडफोड करुन देवतांचे अवयव जोडून मुळं बुध्द मुर्ती लपविण्याचा सनातनी लोकांनी गेल्या कित्येक वर्षांपासून लांच्छनास्पद प्रकार केला आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा परदेशात जातात तेव्हा बुद्धांचे गोडवे गातात त्यांना स्विकारतात मात्र भारतात मात्र ते बुध्द तत्वज्ञान बुद्धांचा विचार या पासून फारकत घेताना दिसतात युद्ध नको बुद्ध हवा हा संदेश ते जागतिक व्यासपीठावरुन देतात मात्र भारतात तो विषय विचार वर्षातून एकदा बुध्द पौर्णिमा या दिवशी शुभेच्छा संदेश देण्यासाठी वापरतात जगानं बुध्द तत्वज्ञान स्विकारल्या मुळे त्या देशांची प्रगती विकास झाला आहे इथे भारतात मात्र अनेक धर्म जाती पंथ यात शेकडो देवता देवी यांच्या नावांवर भोळी श्रध्दा अंधश्रद्धा जोपासली जाते अंगारे धुपारे नवस सायास यात बहुजन समाज गुरफटलेला आहे अंधश्रद्धेच्या जोखडातून त्यांना बाहेर पडू दिलं जात नाही कर्मठ सनातनी धर्माचे ठेकेदार व प्रस्थापित मक्तेदार दिन दलित बहुजन समाजातील लोकांवर भुत पिशाच्च अक्राळविक्राळ दैवतांची भीती घालून पिढ्यान् पिढ्या इथल्या विकासाच्या वाटेतील अडथळ्यांचे दगड बनून राहिले आहेत राष्ट्राचे समाजाचे व्यक्तीचे हित कशात आहे कल्याणाचा मार्ग कोणता आहे हे इथल्या लोकांना माहीत असुनही परंपरावादी प्रथा चालीरीती अंधश्रद्धा यात त्याला ढकलण्याचे प्रयत्न केले जात आहेत तथागत गौतम बुद्ध सांगतात तुझ्या जीवनाचा शिल्पकार किंवा मार्गदाता तु स्वतः आहे तु स्वयंप्रकाशित हो मी सांगतो म्हणून नाही तर तुझ्या बुध्दीच्या कसोटीवर स्वतःला पारखून घे गौतम बुद्ध यांनी विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेला मानवांच्या कल्याणाचा मार्ग दाखवला त्यांनी सांगितले मी कोणी प्रेषित नाही मी देवांचा अवतार नाही त्यांनी दुःखाचे मुळं कारण शोधण्यासाठी राजधर्म सोडून संन्यस्त वृत्तीने राहिले त्यांचे सहज सरळ साधे जगण्याचे विचार सगळ्या जगाला पटले पण भारतात मात्र त्यांना कस्तुरी झाकून अडगळीत ठेवावी तसे इथल्या धर्म मार्तंडानी बुध्द तत्वज्ञान लपविण्याचा प्रयत्न केला आहे काळाच्या ओघात अनेक राजे महाराजे आले गेले त्यांचे नामोनिशाण मिटले पण अडीच हजार वर्षांनंतर ही बुध्द तत्वज्ञान त्यांनी दिलेला विचार त्यांचा संदेश त्यांचे अलौकिक कार्य चिरंतन आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा