Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

*जिजाऊ ब्रिगेडच्या मार्गदर्शिका कार्यकारी अभियंता शिवमती "सुनिता पाटील" यांचा सन्मान*

 




अकलूज ----प्रतिनिधी

  केदार लोहकरे

 टाइम्स 45 न्युज मराठी

         माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेड यांचे वतीने अकलूज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांचा मराठा सेवा संघ शिवधर्म दिनदर्शिका २०२४ देऊन तालुका अध्यक्ष मनोरमा लावंड यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य,इंजिनिअर उत्तमराव माने,जिजाऊ ब्रिगेडच्या प्रांतिक सदस्य अक्काताई माने,तालुका सचिव राजेंद्र मिसाळ,मराठा सेवा संघाचे अकलूज शहराध्यक्ष शिवश्री नितीन काकडे, शिवाजीराव लोंढे,पत्रकार व प्रेसफोटोग्राफर संजय लोहकरे व केदार लोहकरे,जिजाऊ ब्रिगेडच्या अकलूज शहराध्यक्षा अध्यक्षा श्रीमती शुभांगी क्षीरसागर,शहर कार्याध्यक्ष शिवमती शारदा चव्हाण,संघटक कल्पना चव्हाण, संघटक सुवर्णा क्षीरसागर संघटक,आशा सावंत संघटक, सुवर्णा गोरवे,सुनिता सर्वगोड पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.



         या शिवधर्म दिनदर्शिकामध्ये शिव-पार्वती विवाह,सम्राट अशोक,संत सोयराबाई-संत चोखामेळा, जिजाऊ-शहाजीराजे,आवली-



वसंत,तुकाराम महाराज,सईबाई- छत्रपती शिवराय,सावित्रीबाई फुले-महात्मा ज्योतीराव फुले,महाराणी चिमणाबाई, महाराजा-सयाजीराव गायकवाड, महाराणी लक्ष्मीबाई,राजर्षी शाहू महाराज,रयत माऊली लक्ष्मीबाई-कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादी महापुरुषांच्या विवाहाची माहिती सदर शिवधर्म दिनदर्शिका प्रत्येक पानावर दिली आहे हि दिनदर्शिका पाहून पाटील मॅडम यांनी समाधान व्यक्त केले. माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडचे काम कौतुकास्पद असून जिजाऊ ब्रिगेडला येथून पुढे पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता पाटील मॅडम यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा