Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

*सायकल चालवण्यासाठी लायसन्स परवाना?*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

   *मो.--9730 867 448*

             वाचून आश्चर्य वाटले असेल ना. जुन्या पिढीतील लोकांना "सायकल परवाना" म्हणजेच लायसन्स हा प्रकार नक्कीच अद्याप आठवणीत असणार आहे.


साधारण 1900 साली इंग्रजांनी भारतातील काही भागांमध्ये परवान्याची सुरूवात केली. वाचून आपणास हसू येईल, हे परवाने कोणाला? तर सायकलस्वारांना (त्या काळी सायकलींची संख्या जास्त होती) बैलगाड्यांना व टांग्यांना. हे परवाने पितळी प्लेटमध्ये असत व त्यावर परवाना क्रमांक, सन व गावाचे/ शहराचे नाव लिहिलेले असे.


सदरहू परवाने नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा तहसीलदार यांच्याकडून मिळत. हे पितळी बिल्ले म्हणजेच परवाने सायकलच्या हॅन्डलच्या मध्यभागी असणार्या पट्टीत स्क्रुने कायमस्वरूपी लावले जात.



बैलगाड्यांना किंवा टांग्यांना मात्र गाडीच्या पुढील भागात खिळ्याने ठोकले जाई. हे पितळी परवाने जर वरील उल्लेख केलेल्या वाहनांना लावले नाही, तर पोलीस कर्मचारी त्या व्यक्तीकडून दोन ते सहा अण्ण्याचा दंड आकारत.

असत.


*स्त्रोत : माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,*


*संकलन--प्रविण सरवदे,कराड.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा