अकलुज----प्रतिनिधी
लक्ष्मीकांत --कुरुडकर,
टाइम्स 45 न्युज मराठी..
जि. प. प्राथमिक शाळा,रावबहाद्दूर गट ( बिजवडी ) येथे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
स्वराज्याचा जिने
घडविला विधाता,
धन्य ती स्वराज्य
जननी जिजामाता!
शिवाजी महाराजांसारखा अत्यंत थोर व कर्तबगार पुत्र घडविण्यामध्ये जिजाऊंचा मोलाचा वाटा होता. यवनांचा उच्छेद करून स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न जिजाऊंनी शिवबांच्या मनात उतरवलं. त्यामुळेच महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण झालं. अशा जिजाऊंची जयंती रावबहाद्दूर गट शाळेत मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांची जयंती युवादिन म्हणून साजरी करण्यात आली. सोलापूरचे चार हुतात्मे ज्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाचे बलिदान दिलं, ते जगन्नाथ शिंदे श्रीकिसन सारडा,कुर्बान हुसेन, मल्लाप्पा धनशेट्टी यांना देखील या निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. श्रीकांत राऊत सर यांनी वरील थोर महापुरुषांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ. दिपाली लोखंडे, रोहिणी बंडलकर, अर्चना चव्हाण, स्वाती जाधव, रेश्मा नदाफ, सुवर्णा कदम अश्विनी गरुड, मालन जगताप व शिक्षणप्रेमी महिला उपस्थित होत्या. शाळेच्या वतीने मुलांना केळी वाटप करण्यात आले. सहशिक्षक श्री अजमीर फकीर सर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा