Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ८ जानेवारी, २०२४

तलाठी भरती परिक्षा ही अतिशय पारदर्शक पध्दतीने राबविण्यात आलीय--देवेंन्द्र फडणवीस तलाठी भरती परिक्षेत घोटाळा --विजय वडट्टीवार.

 


टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

            पुणे - तलाठी भरती परीक्षा ही राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. या परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास चौकशी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

या प्रकरणी विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यावर विचारले असता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल. राज्यात तलाठी भरतीच्या रिक्त जागांसाठी भूमि अभिलेख विभागाने परिक्षा घेतली. राज्यभरातून 4 हजार 466 जागांसाठी 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परिक्षा घेतली. अर्जांची संख्या मोठी असल्याने तीन टप्प्यात आणि एका दिवसात तीन सत्रात घेण्यात आली. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी मोठा कालावधी लागला. ही परिक्षा टीसीएस या कंपनीमार्फत घेण्यात आली. गुणवत्ता यादी नुकतीच प्रसिध्द करण्यात आली.


गुणवत्ता यादीबाबत काही शंका उपस्थित झाल्याने विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहे. मात्र भूमिलेख विभागातील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुणवत्ता यादी तयार करताना एका संगणक प्रणालीची मदत घेण्यात आली आहे. उमेदवारांना प्राप्त गुणांवर सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. आता अंतिम निवड यादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

तलाठी भरती परीक्षेत घोटाळा?

तलाठी भरती परीक्षेत एका विद्यार्थ्याला २०० पैकी २१४ गुण मिळाले. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आजपर्यंतच्या शैक्षणिक इतिहासातील हे एक आश्चर्य म्हणावे लागेल. तलाठी भरती परीक्षा हा एक मोठा घोटाळा आहे. या संपूर्ण घोटाळ््याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

२०० पैकी २१४ गुण एका उमेदवाराला मिळत असतील तर परीक्षा घेणारी संपूर्ण यंत्रणा किती गंभीरतेने काम करते आणि सत्ताधा-यांनी पदभरतीचा कसा खेळखंडोबा करून ठेवला, हे आता स्पष्ट होत आहे. तलाठी भरती परीक्षेतील घोटाळ््यावरून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी या भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज सरकारला स्पर्धा परीक्षा करणा-या विद्यार्थ्यांनी सत्तेतून खाली खेचण्याची गरज असल्याचे म्हटले. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेल्या ट्वीटद्वारे ही माहिती समोर आली आहे. एकाच विद्यार्थ्याला वनरक्षक परीक्षेत चोपन्न गुण मिळाले तर तलाठी भरती परीक्षेत दोनशेपैकी दोनशे चौदा गुण मिळाले आहेत. ही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असोत, की सरळ सेवा भरतीच्या परीक्षा असोत. या परीक्षांतील पारदर्शकता पूर्णपणे संपली असून, अहोरात्र मेहनत करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे काम शिंदे-फडणवीस-पवार सरकार करीत आहे, असा आरोप केला.

तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येतील, अशी भूमिका घेतली. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.

           *साभार*

     *कोकण न्यूज*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा