*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
आठ दिवसापूर्वी जो माणूस मीडियात देशाचा "नेक्स्ट" पंतप्रधान म्हणून उल्लेख करत होती आज त्याने पुन्हा पलटी मारत बिहारच्या राजकारणाला नवीन कलाटणी दिली. *आपल्या पाच वर्षाचा मुख्यमंत्री कार्यकाळ संपलेला नसतांना पाचव्यांदा भाजप बरोबर सत्तेचा बाजार मांडला.अत्यंत संयमी,विश्वसनीय,दिग्गज व निष्कलंक राजकारणी म्ह्णून आख असणाऱ्या नितिषबाबूंनी बिहारच्या जनतेला पुन्हा मूर्ख बनविले.लक्षात असेलच.....२०१३ ला जेव्हा भाजपने नरेंद्र मोदींना पंप्रधानांचा उमेदवार नाव घिशीत केले तेव्हा त्यांनी मार्गच बदलला.मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे पानिपत झाले.फक्त दोन जागा मिळाल्या.२०१५ साली लालूनशी हातमिळवणी करत विधानसभा लढविली व मुख्यमंत्री झाले.दोनच वर्षांनी पुन्हा भाजप सोबत जाऊन मुख्यमंत्री झाले.विशेष म्हणजे २०१९ लोकसभा आणि २०२० विधानसभा एनडीए सोबत लढविली आठ ऑगस्ट २०२२ राजी भाजपला सोडचिट्ठी देत लालू सोबत जाऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.आता दीड वर्षांनी पुन्हा भाजपशी गळाभेट केली. या माणसाने काळ नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.हे सर्व काही स्वतःच्या दमावर नव्हे उलटी-पलटी.....हेराफेरी करत....आता बोला....अश्या राजकारण्यांना काय सज्जन बोलायचं...??
इंडिया आघाडीत ममता दिदींनी बिघडी करत एकला चलोरेचा नारा दिला....त्या नंतर भाजप नेत्यांचा विश्वास वाढला.त्यांनी सॉफ्ट नितिषबाबूंना फास टाकला व ते अलगद अडकले.शनिवारी केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे सोबत नितीश बाबूंनी ब्राहोश्वरनाथ मंदिरात सोबत जाऊन पूजा केली.तेव्हाच बिहारच्या सत्तेची उलटी गिणती सुरू झाल्याचे स्पष्ट झाले. *खरं म्हणजे या "पलटूगिरी"च्या खेळात नितिषबाबूंना "पलटूराम"चा लेबल लावला जात आहे.मात्र मोदी-शहा यांना कोणीच "पालतू मेडिया" "पलटू"...असे सांगण्याची हिंमत करत नाही.लोकसभा -२०२४ मधील बिहारच्या सर्व्हेत भाजपला फटका बसेल असा अहवाल समोर आला होता.त्या मुळे महिन्याभर पूर्वी जे अमितशाह चक्क बिहारच्या जनतेला आम्ही"नितीश सोबत भविष्यात कधीच जाणार नाही म्हणून बोंबलत होते त्यांनी चक्क मोदींना तयार केले. इंडिया आघाडीत बिघाडी करण्याचा डाव शहा यांनी योग्य वेळी साधला.२०२२मध्ये जेव्हा नितिषबाबूंनी भाजपशी संसार मोडून राजद सीबत संसार थाटला तेव्हा "मर मिट जायेंगे...लेकीन अब भाजप के साथ नही जाऍंगे...असा दम भरला होता. दुर्दैवाने एक म्हाताऱ्या राजकरण्याला उतरत्या वयात आता लाज वाटत नाही.
ज्या पद्धतीने राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला भाजपने राजकीय दृष्टीने "कॅश" केले त्या मुळे सहजिकच विरोधकांच्या तंबूत घबराट पसरली.भाजपचा हा "मास्टरस्ट्रोक" होता,हे स्वीकारायला हवं.... अन त्याच्या विरोधात इंडिया आघाडीत तोड नाही.... हे पण सत्य...!मात्र एका अनैतिक राजकारण्याशी तुम्ही पान्हा मांडीला मांडी लावली म्हणून बिहारची जनता प्रश्न विचारल्या शिवाय राहणार नाही.भाजप साठी हा खेळ काही नवीन नाही.कर्नाटक ....मध्यप्रदेश ...गोवा....अन आता मागच्या वर्षी महाराष्ट्र.....सत्तेचा "खेला"कसं करायचं?या साठी भाजप कडे चाणाक्ष "मॅन व मनी पॉवर"टीम आहे.२०२४ साली इंडिया गठबंधन भाजपचा पाठलाग करू शकतं......पण पकडणं कठीण आहे....हे तूर्त तरी सत्य आहे....!!( जयहिंद)
*अशफाक शेख*, -- *वरिष्ठ --पत्रकार, *सहारा समय-औरंगाबाद*....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा