*संपादक ---हुसेन मुलाणी*
*टाइम्स 46 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
सोलापूर -तुळजापूर रेल्वेच्या कामासाठी रेल्वे विभागाने संपादित करत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीस योग्य मोबदला मिळण्यात यावा, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूर वतीने उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी द्वारा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र शासनाच्या रेल्वे विभागाच्या वतीने सोलापूर ते तुळजापूर रेल्वे कामासाठी तुळजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे काम चालू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ला देण्यात येणारा मावेचा हा अत्यंत कमी व अल्प आहे. रेल्वे विभाग शेतकऱ्यांच्या जमिनी या कवडी मोल भावात घेत असून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे तरी, राष्ट्रपती महोदया यांनी यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळवून देण्यास संबंधित विभागास निर्देशित करावे.
असे या निवेदनात म्हटले आहे
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, अनिल शिंदे, दिलीप मगर, विधानसभा उपाध्यक्ष -रुबाब पठाण, शहाजी नन्नवरे ,तुळजापुर शहराध्यक्ष-- अमर चोपदार ,उपाध्यक्ष -मकसूद शेख ,युवक जिल्हा कार्याध्यक्ष-- विवेक शिंदे, आय.टी सेल जिल्हा अध्यक्ष -अमोल पाटील, युवक तालुका प्रभारी अध्यक्ष- शरद जगदाळे, गणेश नन्नवरे, आकाश शिंदे ,वाहेद शेख, शहाजी कसबे, व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा