इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त इंदापूर विधान सभा मतदारसंघात विविध महाविद्यालय, शाळेमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मतदान प्रतिज्ञा घेऊन मतदार दिन साजरा करण्यात आला.
प्रांताधिकारी तथा मतदार नोदणी अधिकारी वैभव नावाडकर, तहसीलदार तथा सहाय्यक मतदान नोदणी अधिकारी श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानूसार इंदापूर विधानसभा मतदार संघात विविध महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींना मतदान प्रतिज्ञा घेऊन मतदार दिन साजरा करण्यात आला. तसेच रयत शिक्षण संस्थचे कस्तुराबाई कदम विद्यालय यांच्या मार्फत शाळा ते तहसील कार्यालय इंदापूर अशी मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली.
यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या केंद्र स्तरीय मतदान अधिकारी ( BLO ) यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी अनिल ठोंबरे निवासी नायब तहसीलदार, मयूर बनसोडे महसूल नायब तहसीलदार व अजय पाटील नायब तहसीलदार यांनी नव मतदारांना मतदान प्रक्रिया बाबत तसेच मतदानाच्या महत्वाबाबत सांगण्यात आले. कार्यक्रमात समन्वयक अजय गायकवाड व शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
मतदान केंद्र क्रमांक ३१२ गणेशवाडी येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. तलाटी अमोल हजगुडे, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी रफिया तांबोळी, गौतम गायकवाड यांनी नव मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. तर उपस्थित मतदारांनी मतदान प्रक्रिया बाबत माहिती विचारून घेतली.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा