Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १८ जानेवारी, २०२४

माळीनगर ता.माळशिरस येथील दफनभूमीची होणारी विटंबना थांबवावी अन्यथा मुस्लिम समाजाचा आंदोलनाचा इशारा...

 


संपादक ----हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448.

                 माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथील मुस्लिम समाज बांधवांच्या दफनभूमीची होत असलेले विटंबना व शेणखत, कचरा टाकून अतिक्रम करण्याचा प्रयत्न प्रशासनाने तात्काळ थांबवावा अन्यथा समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जनआंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी माळशिरस, ग्रामपंचायत माळीनगर, अकलुज पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक , अकलुज उपविभागीय पोलीस अधिकारी , यांना देण्यात आला आहे 


माळीनगर गावाला हागणदारी मुक्त पुरस्कार प्रदान झाला असताना एका आल्पसंख्यांक समाजाच्या पूर्वजांची जेथे दफनभूमी ची अशी विटंबना करणे दुर्दैवी असुन आजही मुस्लिम दफनभूमी शेजारी वास्तव्यास आसणारे नागारिक वारंवार विनंती करुन सुध्दा विटंबना करत आहेत शासन हागणदारी मुक्त गावासाठी आटोकाटपणे प्रयत्न करत असताना त्यांच्या आदेशाला दफनभूमी शेजारील नागरिक केराची टोपली दाखवत आसुन निर्लज्यपणे राजरोसपणे शौचायास बसत आहेत परंतु याकडे संबंधीत प्रशासनाचे आथवा ग्रामपंचायत चे लक्ष नाही,हीच खरी अल्पसंख्यांक समाजाची शोकांतिका असुन या समाजाचा "युज अँन्ड थ्रो म्हणजे कडीपत्त्या सारखा वापर होत असाताना दिसत आहे मुस्लिम समाज बांधवांनी वारंवार तक्रार करून देखील ग्रामपंचायत या कडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे कारण काही आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी या मध्ये हस्तक्षेप करत असल्याचा मुस्लिम समाज बांधवांचे म्हणणे आहे. दोन समाजामध्ये जातीय सलोखा बिघडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत कुंपणच शेत खात असेल तर न्याय मागायचा कोणाकडे ?हा समाजाला पडलेला प्रश्न आहे हाच खरा कळीचा मुद्दा आहे.


दफनभूमीच्या जागेमध्ये शेणखत कचरा, शौचालयाचे पाणी सोडणे, सांडपाणी सोडणे, शौचायास बसणे, संरक्षण भिंतीची तोडफोड करणे, ही होत असलेली विटंबना व शेणखत, कचरा ,टाकून अतिक्रम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अन्यथा समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा