इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
: श्रीक्षेत्र अयोध्या धाम येथे सोमवारी (ता. २२) होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्सवानिमित्त पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथे विठ्ठल मंदिरात उत्सव साजरा होत आहे. या दिवशी पिंपरी बुद्रुक हद्दीत मद्य आणि मांसाहार विक्री बंद ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.
याबाबत पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच भाग्यश्री बोडके, उपसरपंच संतोष सुतार यांनी पत्राद्वारे आवाहन केले आहे की, येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराम उत्सवानिमित्त पिंपरी बुद्रुक गावामध्येही विठ्ठल मंदिरात मोठा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाचे पावित्र्य जपण्यासाठी या दिवशी पिंपरी बुद्रुक हद्दीत मद्य आणि मटन, चिकन व मासे विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी तसेच हॉटेल व ढाबा मालकांनीही मद्य आणि मांसाहार विक्री बंद ठेवून या मंगल उत्सवाला सहकार्य करावे.
अशाचे प्रकारचे आवाहन नरसिंहपूर, टणू, गिरवी, गोंदी ओझरे ग्रामपंचायतने मद्य व मांस विक्री बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा