*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.--9730 867 448*
ईडी आणि इन्कमटॅक्स हे स्वतंत्र विभाग आहेत. त्यांना त्यांचे अधिकार आहेत. त्यात राजकीय आणि शासकीय हस्तक्षेप नसतो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल बोलण्याएवढा मी मोठा नाही. न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात. न्यायालय योग्य पद्धतीने दखल घेऊन न्याय देईल, असे मत उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
ईडीच्या कारवाईवरून ज्येष्ठ नेते खासदार पवार यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्या प्रश्नावर बोलताना मंत्री देसाई म्हणाले, ''ईडी आणि इन्कमटॅक्स या स्वतंत्र यंत्रणा आहेत. त्यांना त्यांचे अधिकार आहेत. राज्य सरकारला आज वाटले आणि उद्या कारवाई केली असे होत नाही.
ईडीकडे काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्या तक्रारीची त्यांच्याकडून अगोदर स्वतंत्र चौकशी त्यांच्या सोर्समार्फत केली जाते. त्यातून आवश्यकता वाटली, तर ज्यांच्याविरोधी तक्रार आली असेल त्यांना समन्स देऊन चौकशीला बोलविले जाते. संबंधितांना म्हणणे मांडण्यास संधी दिली जाते. यानंतर त्या तक्रारीत त्या यंत्रणेला तथ्य वाटले, तर ते त्यांच्या अधिकाराप्रमाणे कारवाई करतात.
सरकारला वाटले एखाद्यावर कारवाई करावी, तर ते तसे होत नाही. त्याची प्रोसिजर आहे. त्यामुळे ज्यांना अटक होतात, चौकशीला समन्स दिले जातात त्याची माहिती राज्य सरकारला दिली जाते. मी गृहराज्यमंत्री होतो. त्यामुळे मला माहिती आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेपाने काहीतरी उद्देश ठेवून कारवाई केली जात नाही.''
*दावोस परिषदेनंतर काय केले ते सांगा*
आदित्य ठाकरे यांनी दावोस परिषदेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यावर बोलताना मंत्री देसाई म्हणाले परकीय गुंतवणूक मानण्यासाठी एखाद्या उद्योजकाला उद्योगपतीला त्यांच्या प्रतिनिधी मंडळाला बरोबर घेऊन गेले तर त्याला दलाल म्हणणे योग्य नाही जी गुंतवणूक राज्यात आणणार आहेत त्यासाठी त्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा केली तर आदित्य ठाकरे त्यांना कोणत्या आधारे दलाल म्हणताहेत त्यापेक्षा त्यांनी आमदार प्रसाद लाड यांनी यापूर्वी दावोसला गेलेल्या शिष्टमंडळातून केलेल्या काही मान्यवरांनी पाठीमागून दोन-तीन दिवस थांबून काय केले हे सांगायची वेळ आणू नका असे म्हटले आहे त्यावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य करावे आणि मग मुख्यमंत्र्याबद्दल बोलावे
*पिण्याच्या पाण्याला प्राधान्य*
पाणीटंचाई तीव्र होणार आहे त्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार असल्याचे सांगून मंत्री देसाई म्हणाले की पिण्याचे पाणी कमी पडणार नाही याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केल्या आहेत पहिल्यांदा पिण्याचा पाण्याचा विचार करून त्यानंतर शेतीच्या पाण्याचा विचार केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
*सौजन्य*
*कोकण न्युज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा