अकलूज ------प्रतिनिधी
लक्ष्मीकांत ---कुरुडकर
टाइम्स 45 न्युज मराठी.
नवी दिल्ली - इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रांविषयीच्या विरोधी पक्षांच्या ज्या शंका आहेत आणि ज्या चिंता आहेत त्या दूर करण्यास निवडणूक आयोगाला अपयश आले आहे असे कॉंग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
या संबंधात आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांकडे भेटण्याचीही अनुमती मागितली होती पण त्यांनी अजून अपॉइन्टमेंटही दिलेली नाही असे त्यांनी म्हटले आहे. आमच्या शंकांना त्यांनी लिखीत उत्तर पुस्तीका आमच्यापुढे सादर करून उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पण आमच्या मूळ शंका आणि चिंता कायमच आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
रमेश यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना या बद्दल पत्र लिहीले आहे, त्यात त्यांनी व्हीव्हीपॅट बाबत काही आक्षेप नोंदवले आहेत. परंतु निवडणूक आयोगाने ते सारे आक्षेप धुडकावून लावले आहेत. रमेश यांनी म्हटले आहे की, मी निवडणूक आयोगाकडे इंडिया आघाडीच्या पक्षांच्या नेत्यांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. पण त्यांनी आम्हाला भेटीची वेळ दिली नाही आणि आमच्या शंकांनाही प्रतिसाद दिलेला नाही.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावर दाखल केलेल्या जनहित याचिका आर्थिक खर्चासह फेटाळण्यात आल्याची आठवण निवडणूक आयोग विरोधी पक्षांना करून देत आहे. याचा अर्थ ते न्यायालयीन निकालाच्या मागे दडण्याचा प्रयत्न करीत आहेत असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
आम्ही उपस्थित करीत असलेले प्रश्न हे न्यायालयीन निकालाच्या वेगळे आहेत असेही रमेश यांनी म्हटले आहे. व्हीव्हीपॅटशी संबंधीत चर्चा करण्यास न्यायालयाच्या कोणत्याही निकालाचा अडथळा नाही असेही रमेश यांचे म्हणणे आहे.रमेश यांनी म्हटले आहे की विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटू नका किंवा त्यांना भेटीची वेळ देऊ नका असा कोणताही न्यायिक आदेश नाही.
*साभार*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा