*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे.त्यांची प्रकृती खालावत चालली असताना शासन व मीडिया दोघेही याकडे दुर्लक्ष करत आहेत.शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाने उद्या दिनांक १४ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.त्यास प्रतिसाद देत माळशिरस तालुका सकल मराठा समाजाने तालुका बंद ची हाक दिली असून आपल्याला अत्यावश्यक बाबी वगळता शांततेच्या मार्गाने हे आंदोलन पार पाडावयाचे आहे,तरी सकल मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी गावातील सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेऊन सहकार्य करावे तरी माळशिरस तालुक्यातील सर्व व्यवसायिकांनी आपली दुकाने फर्म बंद ठेवून सकल मराठा समाजाच्या आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात उपोषणास पाठिंबा द्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः उद्याच्या बंदच्या काळात कोणीही रास्ता रोको करू नये, अथवा जाळपोळ करू नये ,आणि बंद शांततेत पाळून सहकार्य करावे असेही आवाहन माळशिरस तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे
*माळशिरस तालुका सकल मराठा समाज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा