उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील गणेशगांव येथील डॉ.युवराज हनुमंत सोलनकर यांची भारतीय जनता पक्षाच्या माळशिरस तालुका वैद्यकीय आघाडीच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र माळशिरस तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बापूराव पांढरे यांनी दिले आहे.त्यामुळे पुर्व भागात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
डॉ.युवराज हनुमंत सोलनकर यांच्या निवडीमुळे पक्ष चळवळ, पक्ष वृध्दीसाठी आपल्या कार्याचा व अनुभवाचा लाभ भारतीय जनता पार्टीच्या माळशिरस तालुका वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून सामान्य मानवाच्या कल्याणासाठी होईल त्यासाठी डॉ.सोलनकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीमुळे माळशिरस तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात एक धडाडीचे नेतृत्व मिळाल्यामुळे वैद्यकीय क्षेत्राला न्याय मिळेल यामुळे सर्वत्र आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले आहे.
डॉ.युवराज सोलनकर यांची निवड झाल्याबद्दल विधान परिषदेचे आ.रणजीतसिंह मोहिते-पाटील,भाजप नेते धैर्यशील मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, बापूराव नारायणराव पांढरे तालुकाध्यक्ष ,सचिन शिंदे भाजपा सरचिटणीस यांनी त्यांचे अभिनंदन व पक्ष कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा