Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

अकलूजच्या भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांचे उज्वल यश जीसीसी-टीबीसी डिसेंबर 2023 परिक्षेत आनिल भारत माळी92.00%गुण मिळवून माळशिरस तालुक्यात प्रथम तर जावेद हारुण मुलाणी तृतीय.

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

          अकलूज :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने डिसेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय जीसीसी-टीबीसी परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेमध्ये भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेत यशाची पुर्वपरंपरा कायम ठेवत उज्वल यश प्राप्त केले आहे.

या परीक्षेमध्ये या संस्थेतील माळी अनिल भारत या विद्यार्थ्याने कॉम्प्युटर टायपिंग परीक्षा जीसीसी-टीबीसी इंग्रजी 30 श.प्र.मि. या विषयात 92.00% गुण प्राप्त करत माळशिरस तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळविला, तर मुलाणी जावेद हरून याने व माळी  अनिल भारत या दोघांनी इंग्रजी 40 श.प्र.मि. या विषयात 88.5% गुण प्राप्त करत माळशिरस तालुक्यात विभागून तृतीय क्रमांकाचा बहुमान प्राप्त केला.

जीसीसी-टीबीसी डिसेंबर 2023 परीक्षेत विषयानुसार संस्थेतील प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे :-

इंग्रजी 30 श.प्र.मि. या विषयात :- माळी अनिल भारत 92% प्रथम, वाघमारे ज्ञानेश्वर शहाजी 86.50% द्वितीय, पिसे सागर सयाजी 84% तृतीय.

इंग्रजी 40 श.प्र.मि. या विषयात :- मुलाणी जावेद हरून व माळी अनिल भारत दोघेही 88.50% गुण प्राप्त करत संस्थेत विभागून प्रथम, भरते सौरभ अजय 87.50% द्वितीय, लोखंडे प्रियांका विलास 85% तृतीय.

मराठी 30 श.प्र.मि. या विषयात :- वाघमारे अभिजीत नवनाथ 82.50% प्रथम, मकवाने पूजा गणपत 81% द्वितीय, वाघमारे ज्ञानेश्वर शहाजी 80.50% तृतीय, असे गुण प्राप्त करत या सर्वांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत शासकीय, निम-शासकीय विभागातील लिपिक (क्लार्क) पदांच्या भरतीसाठी जीसीसी- टीबीसी मराठी, इंग्रजी व हिंदी 30 व 40 शब्द प्रति मिनिट या विषयांचे कोर्सेस चालविले जातात. परिषदेच्या वतीने वर्षभरातून दोनदा या परीक्षा घेतल्या जातात व या परीक्षा पास झालेले विद्यार्थी सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे आदी विभागातील लिपिक पदांच्या भरतीसाठी पात्र ठरतात.

डिसेंबर 2023 मधील जीसीसी-टीबीसी परीक्षेत यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे प्राचार्य गजानन जवंजाळ सर, नितीन दुरणे सर, किरण भगत सर, ज्ञानदीप जवंजाळ सर, संचिता नेटके मॅडम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. उज्वल यश प्राप्त करत उत्तीर्ण झालेल्या र्विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून भक्ती संस्थेच्या वतीने प्राचार्य गजानन जवंजाळ सर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा