उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
उस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होताना सध्या निदर्शनास येत आहे .इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली दिसत आहे . एकतर उसाला हवा तसा दर मिळत नाही यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे ठिबक सिंचन द्वारे थेंब थेंब पाणी देऊन उस शेतकऱ्यांनी जोपासला आहे .साधारण दीड वर्षांनतर उस कारखान्यात नेला जातो .धन दांडगे शेतकरी आहेत ते उस तोड कामगार व वाहनचालकास पैसे देऊन उस कारखान्यात वेळेवर पाठवतात , या पद्धतीमुळे ऊसतोड मजुर प्रत्येक उस उत्पादक अल्पभुधारक शेतकऱ्याकडून पैसे घेतल्याशिवाय उस तोडणारच नाही असे म्हणत आहेत .नाही तर द्या उस पेटवून असे ठाम पणे शेतकऱ्यांना सांगत आहेत .उस पेटवला तर ठिबक सिंचन चे पाईप जळून खाक होतात हे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते एकरी ठिबक सिंचनाचा खर्च वीस हजार रु. एवढा येतो उस पेटवल्यास पुन्हा बैलगाडी फडातून बाहेर मुख्य रस्त्याला आणण्यासाठी ट्रॅक्टर चा प्रति बैलगाडी दोनशे या प्रमाणे खर्च, उस वाहून नेहण्यासाठी ट्रॅक्टर लावला आणि तो शेतात फसला तर त्याला काढण्यासाठी जेसीबी ला बोलवायचे त्याचा खर्च साधारण चार पाच हजार रुपये .उसाला तोड यायची ,वाहन फसू नये म्हणून पाणी बंद केले जाते त्यामुळे उसाचे वजन घटत जाते आणि उस पेटवला तर उसातील पाण्याची क्षमता कमी होते परिणामी उसाचे वजन कमी होते आणि जळालेल्या उसाचे दर कारखाना प्रतिटन २०० रु ने कमी देतो यात शेतकऱ्याचे १० टना मागे दोन हजार रु.या प्रमाणे एकरी साधारण १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान होते . लागवडी पासून चा खर्च वेगळाच . अल्प भूधारकां च्या खिशाला हे परवडणारे नाही परंतु लाचार शेतकरी करणार तरी काय ? " मरता क्या न करता " या उक्तीप्रमाणे हा सर्व खर्च त्याला नाईलाजाने करावाच लागत आहे .
गणेशगांव येथील शेतकरी फकृद्दीन शेख यांचा उस माळीनगर कारखान्याला जाणारा आहे मागच्या वर्षी जुन मध्ये उसाची लागवड केली आहे सध्या फेब्रुवारी महिना चालू आहे म्हणजे वीस महिने झाले आहेत उस लागवड करून आणि उस अजून शेतातच आहे .ऊसतोड कामगार आले उस पाहायला आणी म्हणाले , " तुमचा उस लईच वाढलाय " ' अन पडलाय पण ', द्या पेटवून ! नाहीतर दहा हजार द्या !!! 'सात हजार एकरी घ्या, आणि माझा उस तोडा " , म्हणताच उस तोड मजुरांनी नकार दिला . *उस चांगला पोसलाय , वाढलाय ही कृषिप्रधान देशातील* *शेतकऱ्याची चुक झाली* *का ??* हो चूकच म्हणावे लागेल , की दुर्दैव म्हणावे लागेल ? चांगला वाढलेला ,पडलेला उस तोडणे उस मजुरा ना परवडत नाही ? म्हणून शेतकऱ्याची आर्थिक लुट करायची का ? टनामागे ठरलेला दर कारखाना या कामगारांना देणारच आहे मग शेतकऱ्याची अशी लुटमार का होत आहे ?
कारखान्याकडे शेतकऱ्याने धाव घेताच अधिकारी म्हणतायत *द्या* *की मग* *वाढवून .* म्हणजे चारही बाजूने शेतकऱ्याची पिळवणूक चालू आहे . शेतकऱ्याची बाजू कारखानदार जर समजून घेणार नसतील तर प्रत्येक शेतकरी उस लागवड करणे नुकसान कारक असल्याने उस लागवड करणारच नाही .वैतागून गेलेला प्रत्येक उस उत्पादक शेतकरी सध्या म्हणत आहे उस लावला चुक झाली या नन्तर उस लागवड करणार नाही ... ही शेतकऱ्याची दयनीय अवस्था का होत आहे ?. कारखानदार मुजोर मजुराना लगाम लावत नाही शेतकरी यात भरडला जातोय याकडे कारखानदारांचे दुर्लक्ष दिसत आहे .कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यायला पाहिजे.अन्यथा त्रस्त, लाचार ,वैतागलेल्या शेतकऱ्याने उस लागवड केलीच नाही तर कारखाने चालणार नाहीत याचे मोठे नुकसान कारखान्यांना येत्या काळात सोसावे लागणार आहे. कारखानदारानो , शासनकर्त्यानो शेतकऱ्याच्या संयमाचा उद्रेक होण्याची वाट पाहू नका .थांबवा .... शेतकऱ्याची पिळवणूक थांबवा . शेतकरी जगला तरच देश जगेल हे लक्षात ठेवा , शेतकरी दुःखी हताश लाचार असेल तर देश कसा सुखी सम्पन्न होईल ??
नूरजहाँ शेख
गणेशगाव .ता.माळशिरस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा