Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०२४

*शंकरनगर येथे "कै शंकरराव मोहिते पाटील "यांच्या 45 व्या पुण्यतिथीनिमित्त -ह भ प कल्याण महाराज काळे पाटील -यांचे श्रीहरी कीर्तनाचा कार्यक्रम*

 


*अकलुज ---प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी.

         माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि कै. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या ४५ व्या पुण्यतिथी निमित्त शंकरनगर येथील विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्टच्या वतीने ह.भ.प. कल्याण महाराज काळे-पाटील यांचे श्रीहरी किर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट हे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.


       रविवार दि.११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजता स.म.शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या जनरल ऑफिस समोर शिवशाहीर,झी टॉकीज फेम,ह.भ.प.कल्याण महाराज काळे-पाटील शेवगांव, (जि.अहमदनगर),ह.भ.प.राजेंद्र महाराज शास्त्री गायनाचार्य (बीड),ह.भ.प.नवनाथ महाराज बडे गायनाचार्य (शिरुर-कासार), ह.भ.प.कैलास महाराज शिंदे पखवाज वादक (भूम) यांचा श्रीहरी किर्तनाचा कार्यक्रम आयोजन श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट, शंकरनगर- अकलूज यांनी केलेला आहे.तरी परिसरातील भाविक व भक्तांनी या श्रीहरी किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे सेक्रेटरी अभयसिंह माने-देशमुख केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा