*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचा मोठ्या दिमाखात आजपासून शंकरनगरच्या स्मृतिभवनच्या बादशाही रंगमंचावर प्रारंभ झाला आहे.या स्पर्धेचे उद्घाटन सौ.सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते पाटील व सौ.कांचनमालादेवी मदनसिंह मोहिते पाटील यांचे हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नृत्यांगना राजश्री नगरकर,मीना परभणीकर,सरलाताई नांदोरीकर, रेश्मा परितेकर यांचे हस्ते सुलक्षणादेवी मोहिते पाटील व कांचनमाला मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते पाटील यांची जन्मशताब्दी वर्ष व जयसिंह मोहिते पाटील व मदनसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील,जयंती समारंभ समिती अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील,समितीचे कार्याध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,लावणी स्पर्धा समिती अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी उपस्थित होते.यावेळी नटरंग कला केंद्र मोडनिंब यांनी लावणी सादर करीत स्पर्धेला सुरूवात केली.
*चौकट*
लावणी कलेचे जोपासक जयसिंह मोहिते पाटील यांनी सुमारे २७ वर्ष राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन करून लावणी कलेला लोकाश्रया बरोबरच राजाश्रही मिळवून दिला.या मुळे कलावंतांना सन्मान मिळाला.जयसिंह मोहिते पाटील (बाळदादां) यांच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त स्पर्धेच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी दिनांक ८ रोजी खास महिलांसाठी लावणीचे दोन शो आयोजित करून लावणी कलावंत व महिला प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करीत बाळदादांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा