Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४

*शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे--"पृथ्वीराज चव्हाण"* *विधी सेवा महाशिबिराचे उद्घाटन*

 


*अकलुज ----प्रतिनिधी*

*केदार लोहकरे*

*टाइम्स 45 न्युज मराठी

                जात,पंथ,भेदभावामुळे समाजातील वंचित,उपेक्षितांना समाज प्रवाहात आणून भारतीय समानता अस्तित्वात आणण्यासाठी डॉ.बाबासाहेबन आंबेडकर यांनी घटना लिहिली आहे.या घटनेनुसार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासकीय योजना,सुविधांचा लाभ पोहोचला पाहिजे तसेच सर्वांना न्यायन मिळाला पाहिजे,असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.


        अकलूज येथील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात राष्ट्रीय,महाराष्ट्र राज्य व जिल्हा विधि सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विधि सेवा महाशिबिराचे उ‌द्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण व न्यायमूर्ती फिरदोश पोनिवाला यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.     

        याप्रसंगी मुख्य न्यायाधीश मोहंमद आझमी,माळशिरस विधि सेवा समिती अध्यक्ष न्यायाधीश एम.एन.पाटील,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह जिल्ह्यातील न्यायाधीश व विधीज्ञ उपस्थित होते.


        अकलूजमध्ये विधि सेवा महाशिबिराचे उद्घाटन करताना न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण, न्यायमूर्ती फिरदोश पोनिवाला, मुख्य न्यायाधीश मोहंमद आझमी,न्यायाधीश एम.एन. पाटील.मोहिते-पाटील यांच्यासह जिल्ह्याभरातील न्यायाधीश, विधिज्ञ उपस्थित होते.या शिबिरात शासकीय, निमशासकीय कार्यालये व महिला बचत गट असे ३० स्टॉल लावण्यात आले होते.

           याप्रसंगी मोहंमद आझमी म्हणाले,केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांची विधि सेवा योजनांची विधी प्राधिकरणाच्या माध्यमातून सामान्य जनतेला माहिती देऊन लाभ मिळवून दिली जातो. जनजागृती करण्यासाठी महाशिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे आभार एम.एन.पाटील यांनी मानले.


*चौकट*

*१०५ जणांना १ कोटी १२ लाखांची मदत*

जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव नरेंद्र जोशी यांनी शासकीय सेवा,सुविधांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत देण्यासाठी विधि सेवा अधिनियम १९८० साली अस्तित्वात येऊन ९ नोव्हेंबर १९८५ पासून विधि सेवान प्राधिकरणाचे कार्य सुरू झाले.शासकीय योजनांच्या लाभा बरोबरच पीडित,आर्थिकदृष्ट्या खचलेल्यांना आर्थिक साहाय्यन मिळवून दिले जाते.आतापर्यंत १०५ जणांना १ कोटी १२ लाख आर्थिक मदत मिळवून दिली असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा