Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४

*"सुवर्णा रामभाऊ सुरवसे" यांचे -हृदय विकाराच्या झटक्याने निधन*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

                अकलूज (कर्मवीर चौक )येथील" विजय प्रताप हेअर सलून" चे मालक रामभाऊ सुरवसे -यांच्या पत्नी सुवर्णा रामभाऊ सुरवसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मित निधन झाले.! मृत्यू समयी त्या 40 वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात -पती, १ मुलगा १ मुलगी असा परिवार असून अकलूज येथील आकलाई मंदिराजवळील वैकुंठ भूमी त्यांच्यावर दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले             

                                     विशेषतः दिनांक 18 फेब्रुवारी रोजी मयत सुवर्णा रामभाऊ सुरवसे यांच्या दिराच्या मुलाचे लग्न होणार होते मात्र त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला त्यामुळे या सुरवसे कुटुंबावर आनंदाच्या क्षणापूर्वीच दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

तसेच सुवर्णा सुरवसे यांचे( तिसऱ्याचा) सावडायचा कार्यक्रम मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सकाळी -७/३० वाजता अकलूज येथील स्मशानभूमीत होणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा