Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४

सदाशिवनगर येथील" श्री शंकर सहकारी साखर कारखान्यास" "भारतीय शुगर "चा" उत्कृष्ट आर्थिक पुनर्रचना व व्यवस्थापन पुरस्कार" प्रदान

 


संपादक ---हुसेन मुलाणी

टाइम्स 45 न्युज मराठी

मो.9730 867 448

              श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर कारखान्यास *"भारतीय शुगर"* या देश पातळीवर नामांकित संस्थेतर्फे सन २०२३-२४ वर्षाकारिता ११ व्या परिषदेमध्ये "उत्कृष्ट आर्थिक पुनर्रचना व व्यवस्थापनाचा पुरस्कार दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी हॉटेल सयाजी कोल्हापूर या ठिकाणी "भारतीय शुगर "ने आयोजित केलेल्या 11 व्या वार्षिक परिषदेमध्ये "नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट " कानपुर उत्तर प्रदेशचे संचालक माननीय नरेंद्र मोहन व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.



भारतीय शुगर चे चेअरमन विक्रमसिंह पी. शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह पी. शिंदे, दत्त शिरोळ कारखान्याचे चेअरमन . गणपतरावं पाटील, पी. आर. पाटील, चेअरमन राजाराम बापू सहकारी साखर कारखाना लि. वाळवा, मनोहर जोशी, कार्यकारी संचालक जवाहर सहकारी साखर कारखाना लि. हुपरी उपस्थित होते. श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर चे जेष्ठ संचालक . बाबाराजे देशमुख, संचालक चंद्रकांत शिंदे, संचालक नंदन दाते, कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर स्वरूप देशमुख, कार्यकारी संचालक श्री अभिजित डुबल, शेतकी अधिकारी ए पी गायकवाड, डिस्टीलरी मॅनेजर संजय मोरे, सुरक्षा अधिकारी ज्ञानदेव पवार यांनी सदर पारितोषिक स्वीकारले.



सदर पुरस्कार प्राप्त झालेबद्दल भारतीय शुगर तर्फे श्री. शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन, व्हा. चेअरमन, मा. संचालक मंडळ सभासद, ऊस उत्पादक अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा