*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
मागील काही दिवसात देशातील वेगवेगळ्या भागातील वातावरणात बदल जाणवत आहेत. उत्तरेकडील राज्यामंध्ये थंडीचा कडाका वाढलेला असतानाच हवामान विभागाने राज्यात पावसाचा इशारा जारी केला आहे. येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत मध्य आणि पूर्व भारतात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता आहेत.
हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातअवकाळी पाऊस सांगण्यात आला होता. यानंतर मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या आहेत, तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट देखील झाली.शनिवारी विदर्भातील, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर परिसरात हा पाऊस झाला. वर्धा जिल्ह्यातील देवळी शनिवारी दुपारी तुफान गारपीट झाली.
आज कुठे होणार पाऊस?
राज्यात काही जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामध्ये जळगाव, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा तसेच नागपुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. इतर काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही यावेळी देण्यात आला आहे.
'महाविकास आघाडी'कडून तिकीट मिळण्याची शक्यता
पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के एस होसाळीकर यांनी आजच्या हवामान अंदाजाबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजामुसार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड आणि लातूर या भागात हलक्या स्वरुपाचा. तर जालना, हिंगोली, परभणी येथे वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे
*सौजन्य*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा