*नातेपूते---प्रतिनिधी*
*श्रीकांत-- बावीस्कर*
*टाइम्स 45 न्युज मराठी.*
डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्यासह संघटना पदाधिकाऱ्यांनी आज कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची गडहिंग्लज येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पालकमंत्री मुश्रीफ यांनी कणेरी मठ येथे पार पडलेल्या डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाला काही कारणानिमित्त उपस्थित राहिलो नसलो तरी माझ्या सदिच्छा आपल्यासोबत असल्याचे म्हटले. तसेच येणारा काळ हा डिजिटल मीडियाचाच आहे.
भविष्य़ात डिजीटल मीडिया संघटना भरीव कामगिरी करुन दाखवेल असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. यावेळी डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, राज्य कार्यकारणी सदस्य प्रमोद मोरे, ज्येष्ट पत्रकार सुभाष धूमे, राज्य संघटक राजेश शिंदे, तेजस राऊत, गडहिंग्लज विभागीय प्रतिनिधी नितीन मोरे यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा