*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ रोजी युवक बेरोजगारी, महागाई वाढली, शेतकरी आत्महत्या, कांदा निर्यात बंदी या विविध प्रकारच्या मुद्यावर ८०० किलो मिटर संघर्ष यात्रा काढून जनतेचे प्रश्न सरकारला विचारल्यामुळे विरोधी पक्षामधील मा. शरद पवारसाहेब याच्या विचारांचे नेतृत्व आमदार रोहित (दादा) पवार यांना ई.डी. स्वायत्त संस्थेची क्लीन चीट मिळालेल्या केसची राजकीय सूड उगवण्यासाठी, बदनामी करन्याकरिता दुसऱ्यांदा त्याच केसची चौकशीचे समन्स दिल्यामुळे तसेच सर्व शेतकऱ्यांच्या शेती मालास भाव मिळत नाहीत, कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे आशा विविध प्रकारच्या मागण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचे घंटानाद आंदोलन करण्यात आले
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजय (मामा) निंबाळकर, जिल्हाध्यक्ष संजय (दादा) दुधगावकर, तुळजापूर विधानसभा प्रभारी अध्यक्ष सावंत शिवाजी रामकृष्ण (माजी सैनिक), ग्रा. पं. सदस्य सतीश माळी, मा. ग्रा. पं. सदस्य बाळासाहेब रणसुरे, मा. सरपंच तथा राष्ट्रवादी सा.न्याय विभाग तुळजापूर तालुका अध्यक्ष चंद्रकांत डावरे, शिक्षण समिति उपाध्यक्ष पिंपळा (खुर्द) तथा राष्ट्रवादी सा.न्याय विभाग तुळजापूर तालुका सरचिटणीस महादेव पांडागळे, तुळजापूर विधानसभा उपाध्यक्ष रुबाबभाई पठान तसेच संपूर्ण जिल्ह्यातून विविध पदाधिकारी व कार्यकर्ते, पत्रकार बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा