Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

*विश्वश्वेरैय्या इंजिनिआरिंग काॕलेजची माजी विद्यार्थीनी"पूनम पाटील "हिची क्लास वन अधिकारीपदी निवड.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

            पाटगाव (मिरज) येथील विश्वेश्वरैय्या टेक्निकल कँम्पस, इंजिनियरिंग कॉलेजमधील माजी विद्यार्थीनी कु.पुनम नेमगोंडा पाटील हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जानेवारी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षामध्ये तिने यश संपादन केले आहे.२०२३ मध्ये लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेमध्ये तिने हे यश मिळवले होते.त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होऊन तिची क्लास वन अधिकारी म्हणून निवड झाली आहे.कु.पूनम पाटील या महाविद्यालयातील पहिलीच विद्यार्थीनी आहे.         

         उपजिल्हाधिकारी,निवासी उपजिल्हाधिकारी,तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी अशा गट-अ पदापैकी कोणत्याही पदावर नियुक्ती होणार आहे.

           कु.पुनम यांनी या महाविद्यालयातून मेकॅनिकल विभागातून सन २०१७ या वर्षी उत्तीर्ण झालेली माजी विद्यार्थीनी आहे.तसेच डिग्री ईलेक्ट्रीकल विभागातील विद्यार्थी कु. प्रविणकुमार खंडोजीराव मोरे याची आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स यांच्या वतीने २०१९ साली घेतलेल्या परीक्षेमध्ये Tradsman Mech या पदावर नियुक्ती झाली आहे.हा विद्यार्थी जोधपुर (राजस्थान) येथे ८ फेब्रुवारी २०२४ रोजी रुजू होत आहे.   

           या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव (बापू) इंगवले,सचिव सतीश इंगवले, कार्यकारी संचालक बाळासाहेब इंगवले,संचालक प्रा.डाॅ.इंद्रजीत यादव पाटील यांनी दोघांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.प्रा.ए.आर.पाटील यांनी संयोजन व आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा