*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण द्यावे त्याचप्रमाणे नोकरीत सुध्दा आरक्षण मिळावे म्हणून पंढरपूर येथे शफिक करीम शेख हे 31 जानेवारी 2024 पासून पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले असून आज यांचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे
आज माळशिरस तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने ॲड. वजीर शेख यांनी उपोषण स्थळी जाऊन उपोषणकर्ते " शफिक करीम शेख "यांच्याशी याबाबत चर्चा करून या उपोषणास पाठिंबा दिला आहे
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सलीमभाई मुलाणी, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष( शरद पवार गट) बाळासाहेब शेख ,मुंडेवाडी चे माजी सरपंच अतिक मुलाणी, भारतीय जनता पार्टीचे सांगोला विधानसभा संयोजक गुलाब मुलाणी, आणि शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा