*अकलुज ---प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
नमो चषकाच्या माध्यमातून "सुदृढ भारत,निरोगी भारत" राहो अशी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना राहीली आहे,आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून भविष्यातील भारत घडवण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.कला,क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून लोकांना जोडणं,त्यांच्याशी संवाद साधने असे असून खेळाडू व कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण झाले असल्याचे मत भारतीय जनता पार्टी संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आलेल्या “नमो चषक २०२४″ या राज्यस्तरीय कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव स्पर्धेचे आयोजन माळशिरस विधान सभामध्ये करण्यात आले होते.आज एकांकिका,वक्तृत्व स्पर्धा,नृत्य वैयक्तिक व सांघिक अशा कलाप्रकारांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी या स्पर्धेची संकल्पना मांडली.
यावेळी माळशिरस तालुका उपाध्यक्ष अमरसिंह माने देशमुख, भाजपा युवा मोर्चा संयोजक सुरज मस्के,डॉ.विश्वनाथ आवड, डॉ.छाया भिसे,डॉ.जनार्दन परकाळे,डॉ.अपर्णा कुचेकर, सुनिल कांबळे,अमित पुंज,प्रा.धिरज गुरव,मनोज जगताप यांच्यासह कला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे *वक्तृत्व स्पर्धा शालेय गट*-श्रीजा पत्की,ध्रुव देवकाते,रूद्र खंडागळे, मेहरून मुलाणी व संस्कृती शेंडगे
*वक्तृत्व स्पर्धा खुला गट*-रोहित देशमुख व नागनाथ साळवे प्रथम, रोहन कवडे व नेहा माने द्वितीय, रोहित माने व माधुरी वाघमोडे तृतीय *समूहनृत्य स्पर्धा* प्रथम नटराज ग्रुप,प्रोत्साहनपर विद्यासागर क्लासेस वैयक्तिक नृत्य प्रथम सच्चीदानंद नारायणकर,रिक्तम समंता, द्वितीय माधवी हिवरे,त्रिशा शिंदे,तृतीय वेदश्री पोरे,धैर्यलक्ष्मी एकतपुरे व कामिल नदाफ
*एकांकिका स्पर्धा* प्रथम क्रमांक उकळी, द्वितीय क्रमांक चिमटा यांनी पटकाविला तर उत्कृष्ट स्त्री अभिनय दुर्गा गायकवाड,उत्कृष्ट पुरूष अभिनय कृष्णा कांबळे यांनी पटकाविला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा