*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
"मुंबई : सरकारकडून आता नुसता घोषणांचा पाऊस पडतो आहे. असं नुसतं घोषणा करणारं सरकार आम्हाला नको आहे. दुष्काळात तेरावा महिना करणारं सरकार या देशाला नको आहे. एकवेळ आम्हाला इंडिया आघाडीचं मिलीजुली सरकार चालणार मात्र आम्हाला हे असे हुकुमशहा सरकार नको आहे, असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. ते सिंधुदुर्ग येथील सभेत बोलत होते.
ठाकरे म्हणाले, आघाडीत अनेक विचारांचे लोक एकत्र आले आहेत. त्यामुळे आघाडी सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे काम करते. आघाडी ही सर्वसामान्यांची असल्याचेही ठाकरे सभेत बोलतांना म्हणाले. सरकारकडून जनधन योजना, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत योजना, पीएम स्वनिधी योजना, जलजीवन मिशन, पीएम किसान, मत्स्य योजना अशा योजना राबवल्या जात आहेत. परंतु या योजनांचा लाभ केवळ गुजरातलाच मिळत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. तर यातील काही योजनांना मोदींनी आपले नाव दिले आहे. हे सरकार मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मोदी सरकारचा एक रथ गावागावात फिरतोय. त्या रथाला गावकरी विरोध करत आहेत. या देशाचे नाव बदलून मोदी सरकार ठेवले जात आहे. या देशाचे नाव मोदी सरकार आहे की भारत सरकार? असा सवालही ठाकरेंनी केला. तसेच योजनांनाही मोदींचे नाव दिले जात आहे. या योजना काही मोदींच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत की सरकारच्या आहेत.
गावागावत होऊन जाऊ द्या चर्चा
२०१४ साली मोदींनी चाय पे चर्चा हा कार्यक्रम केला होता. आता आपण गावागावात, पारावर बसून एक चर्चा करू. ती म्हणजे होऊन जाऊ द्या चर्चा हा कार्यक्रम आपण गावागावात सुरू करा आणि प्रत्येकाने सरकारच्या कामावर बोलायला सुरूवात करा. १०० स्मार्ट सिटी बनवण्याचे मोदींनी सांगितले होते. मात्र आत्तापर्यंत किती शहरे स्मार्ट झाली आहेत, असेही ठाकरे म्हणाले."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा