उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
गणेशगांवमध्ये पुन्हा घडणार हिंदू मुस्लिम एकात्मतेचे दर्शन
माळशिरस तालुक्यातील गणेशगांव येथील श्री गणेश जन्मोत्सव निमित्त झी मराठी वाहिनीवर वेध भविष्याचे कार्यक्रम सादर करणारे पंडित अतुल शास्त्री भगरे (गुरूजी) यांचा गणेश मंदिरात श्रीमद भागवत चरित्र कथामृत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह.भ.प.अंकुश महाराज रणखंबे (गिरवीकर) यांच्या कृपा आशिर्वादाने चिंता कलेश दारिद्रय यांचा नाश करून बुध्दी वाढवणाऱ्या श्री गणेशाची जयंती निमित्त सोलापूर जिल्ह्यातील प्रसिध्द असणाऱ्या श्री स्वयंभू गणेश मंदीर गणेशगांवामध्ये दर वर्षी अतिशय मोठ्या पध्दतीने 'गणेशयाग' गेला जातो.गेली १५ वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा करत आहे.यंदाचे हे १६ वे वर्ष आहे हा गणेशयाग अतिशय भव्यदिव्य आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमास आजपर्यंत भक्तांनी जो प्रतिसाद दिलेला आहे.तो पाहून या वर्षी खालील कार्यक्रमाचे गणेश जयंती दिवशी आयोजन करण्यात आले आहे.तरी गणेश भक्तांनी गणेशयाग दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री शंभू महादेव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शरद मोरे-पाटील यांनी केले आहे.
श्री गणेश मंदिरात दि.१२ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये सोमवार दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ ते १० श्रींची ग्रामप्रदक्षिणा (छबीना) काढण्यात येणार आहे.श्री गणेशयाग-तेहतीस ब्राम्हणांकडून गणपतीच्या मुर्तीला गणपती आथर्वशीर्षाचे ११०० आवर्तनांचा अभिषेक करून ११०० मोदकांचे हवन केले जाते. मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी श्री गणेशयाग होमहवन-सकाळी १० ते सायं. ४ वा.सायंकाळी ७ पासून महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
झी मराठी वाहिनीवर वेध भविष्याचा कार्यक्रम सादर करणारे परमपूज्य पंडित अतुल शास्त्री भगरे (गुरुजी) यांचा श्रीगणेश जन्मोत्सवानिमित्त
संगीतमय श्रीमद भागवत चरित्र कथामृत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार दि.१३ फेब्रुवारी ते गुरुवार १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते ८ या वेळेत पंडित अतुल भगरे गुरुजी यांचे प्रवचन होणार आहे. व साधारण ३० हजार लोकांच्या महाप्रसादाचे नियोजन सलग चार दिवस करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री शंभु महादेव चॅरिटेबल ट्रस्ट गणेशगाव यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.गणेशयाग समिती गणेशगांव,शिवशंभू युवा प्रतिष्ठान, गणेशगांव,आहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठान गणेशगांव,टिपू सुलतान ग्रुप गणेशगांव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठान गणेशगांव,दशरथदादा मोरे-पाटील मित्र मंडळ,गणेशगांव व समस्त ग्रामस्थ हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व धर्मीय एकत्र येऊन उत्साहाने सहभागी होऊन एकात्मतेचे दर्शन घडविणार आहेत .
श्री.शंभू महादेव चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष शरद मोरे-पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रय गोरे,सचिव दशरथ दादा मोरे-पाटील, संचालक विरेंद्र पांढरे,केशव सोलनकर,सागरराजे (बंटी) मोरे-पाटील,गणेश यादव, तज्ञ संचालक,पोपट रूपनवर, संचालक दत्तात्रय रेडे-पाटील, संचालक संभाजी बनसोडे, संचालक,ज्ञानेश्वर माऊली मदने तज्ञ संचालक व सर्व गणेशगांव ग्रामस्थांच्या वतीने हा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा