Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

*सोलापूर जिल्ह्याबद्दल आत्मीयता असेल तर पुण्याच्या धरणांमधून उजनी मध्ये पाणी सोडा* *जनशक्ती संघटनेचे-- अतुल खूपसे पाटील यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

              राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या ज्या वेळी अडचणीत होता, त्या त्या वेळी या पक्षाला सोलापूर जिल्ह्याने साथ दिली आहे. भाजपची लाट सुरू होती आणि राष्ट्रवादीला अनेक जण सोडून जात असताना राष्ट्रवादीला सोलापुरातील सभेने उभारी दिली. आजही पक्ष फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी सोबत आहे असे अनेक वेळा 'पवार' कुटुंबीयांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याबद्दल आत्मीयता असेल तर उत्तरदायित्व म्हणून पुण्याच्या धरणांमधून उजनीसाठी पाणी सोडावे अशा आशयाचे पत्र जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे.




 या पत्रात पुढे म्हटले आहे की, यंदा पाऊस म्हणावा तसा झाला नाही. त्यामुळे उजनी धरणाने सत्तरी पार केली नाही हि वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत पाणी टिकवून ठेवणे आणि ते पाणी उन्हाळ्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत घालविणे ही शासन आणि प्रशासनाची प्रामुख्याने जबाबदारी आहे. मात्र आज उजनी धरण सुमारे २० टक्के मायनस मध्ये गेले आहे. अशा परिस्थितीत उजनी मध्ये पुण्याच्या धरणातून पाणी सोडणे आवश्यक आहे, मात्र वरील धरणातून उजनी मध्ये पाणी सोडणे शक्य नसल्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 


 एकीकडे सोलापूर जिल्ह्याबद्दल अत्यंत प्रेम आहे असे दाखवायचे, आणि दुसरीकडे उजनी धरणावर डल्ला मारायचा म्हणजे हे पुतना मावशीचे प्रेम आहे काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.

 त्यामुळे सोलापूर जिल्ह्याबद्दल उत्तरदायित्व म्हणून पुण्याच्या धरणांमधून उजनी मध्ये पाणी जोडून सोलापूर जिल्ह्याचा उन्हाळा हलका करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा