Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

*पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक, डाॕ.यशवंत कुलकर्णी यांना" भारत शुगरचा" " बेस्ट कार्यकारी संचालक" पुरस्कार प्रदान*

 


*श्रीपूर---बी.टी.शिवशरण

              कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी साहेब यांना देश पातळीवर साखर उद्योगांमध्ये काम करणाऱ्या भारतीय शुगर या नामांकित संस्थेचा राष्ट्रीय स्तरावरील बेस्ट कार्यकारी संचालक हा पुरस्कार आज रोजी कोल्हापूर येथे साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे नरेंद्र मोहन तसेच संग्राम सिंह शिंदे यांचे शुभहस्ते प्रदान करणेत आला. यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक व्हाईस चेअरमन कैलास खुळे आदी संचालक उपस्थित होते

 डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदाचा पदभार स्वीकारले पासून कारखान्याच्या गाळपक्षमतेमध्ये व को-जन प्रकल्पामध्ये वाढ झाली असून आसवनी प्रकल्पाची ही क्षमता वाढवली आहे. यांच्या कार्यकाळामध्ये कारखान्याने अनेक पूरक उद्योग उभारले असून त्यामध्ये आसावनी प्रकल्पाचे विस्तारीकरण, ऑक्सिजन प्लांट उभारणी, माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा, जिवाणू खत निर्मिती प्रकल्प, वाखरी येथील प्रशासकीय इमारत, सोलर ऊर्जा प्रकल्प इत्यादी प्रकल्प उभारले आहेत. हे सर्व प्रकल्प अत्यंत उत्कृष्टपणे सुरु आहेत. त्याचबरोबर श्रद्धेय मोठ्या मालकांच्या आशीर्वादाने व कारखान्याचे अभ्यासू चेअरमन .आ.प्रशांतराव परिचारक मालक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या गाळपामध्ये सातत्याने वाढ होत असून कारखान्यांच्या को-जन प्रकल्पामधूनही जास्तीत जास्त वीज निर्माण करुन जास्तीत जास्त युनिट एक्सपोर्ट केली आहे. यांच्या कार्यकाळामध्ये कारखान्याच्या कामकाजामध्ये सुसुत्रता आणली. असून कामगारांचे पगार, मालपुरवठादार यांची देणे, शासकीय देणे, त्याचबरोबर शेतकऱ्यांची ऊस बिले, तोडणी वाहतूक ठेकेदारांची बिले वेळेवर देत आहेत.

 कारखान्याचे चेअरमन श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक (मोठे मालक) यांच्या "शेतकरी हिताय कामगार सुखाय" या ब्रिद वाक्याचे तंतोतंत पालन कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी करीत आहेत. त्याचबरोबर व्यवस्थापन आणि कामगार यांच्याबरोबरचे संबंधही सलोख्याचे ठेवले आहेत.

 कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास सुमारे 55 पुरस्कार मिळाले असून डॉ.यशवंत कुलकर्णी यांचा यामध्ये मोठा वाटा आहे. यांच्या कार्यकाळामध्ये काररखान्याच्या उत्पादनामध्ये वाढ होवून ‍ अर्थीक प्रगतीचा आलेख उंचावत गेला आहे. याची दखल राष्ट्रीय स्तरावर होवून डॉ.यशवंत कुलकर्णी यांची अनेक शासकीय,‍ निमशासकीय कमिटीमध्ये, आभ्यासगटामध्ये निवड झाली आहे. त्याचबरोबर कारखान्याचे चेअरमन मा.आ..प्रशांतराव परिचारक (मालक) यांनाही बेस्ट चेअरमन म्हणून गौरविणेत आले आहे.

 भारतीय शुगर ही साखर उदयोगामध्ये काम करणारी नामांकित संस्था असून या संस्थेचा सर्वोच्च असणारा बेस्ट कार्यकारी संचालक हा पुरस्कार मानाचा समजला जातो. अशा संस्थेचा पुरस्कार घेतेवेळी कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक), व्हा.चेअरमन .कैलास खुळे, संचालक, .दिनकरभाऊ मोरे, वसंतनाना देशमुख, .दिलीपराव चव्हाण, दाजी पाटील.तानाजी वाघमोडे, बाळासो यलमार त्याचप्रमाणे कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डॉ.यशवंत कुलकर्णी

कार्यकारी संचालक 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा