*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
*राजे लसूण--भाव खातोय फार-- झालाय ४०० च्या पार..*
कांदा झाला टोमॅटो झाला
आता राजा बनलाय लसूण भाव तुमचा वाढलाय म्हणून
बळीराजा पाहे तुमच्याकडे हसून !!
येताय ऐटीने पिशवीत बसून किलो किलोने जात होता
आता जाताय छ्टाक छ्टाक
चवच नाही हो तुमच्या वाचून !!
रेकॉर्डच ब्रेक केलाय तुम्ही यंदा चारशे पार करून
सिंहासनावर बसलाय ऐटीत
बघा थोडं खाली उतरून !!
बळीच्या घामाची कदर नाही कोणाला
संपावर जाता शेतकरी होईल काय ?
जाणीव तुम्ही दिली सर्वांना करून
सोडा रुसवा आता नका बसू रुसून !!
कवियत्री : नूरजहाँ फकृद्दीन शेख
गणेशगांव ता माळशिरस
जिल्हा सोलापूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा