*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
माय बाप प्रतिष्ठान,टेंभुर्णी,ता.माढा,जि.साेलापूर आयोजित राज्यस्तरीय माय बाप साहित्य भूषण या महाराष्ट्रातील मानाच्या पुरस्काराने लेखक इंद्रजित पाटील यांना आज गाैरवण्यात आले.त्यांच्या लालित्यपूर्ण लिखाण असणाऱ्या ' जीवनाचा उपासक - कर्मवीर लाेहाेकरे गुरूजी ' या चरित्र ग्रंथासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.या पुस्तकाला हा आठवा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह व राेख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असून सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाबाराजे बाेबडे,तालुका अध्यक्ष,भारतीय जनता पार्टी,प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष .संजय साठे सर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.यावेळी
.कैलासजी सातपुते सर यांची प्रमुख उपस्थिती होती.त्याचबरोबर .नागू वीरकर,प्रा.डाॅ.सुनील पवार हे इतर पुरस्कार्थी व महाराष्ट्रातील नामांकित साहित्यिक तसेच दर्दी रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत हा बहारदार कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन "माय बाप" प्रतिष्ठानचे सचिव .विनाेद तांबे,चेअरमन .शंतनु उंट,काेषाध्यक्ष .महेश बाेबडे,प्रसिद्धी प्रमुख .रमेश वडवराव,सदस्य .अजीज आवटे यांनी केले.राेटरी क्लब,टेंभुर्णी या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रमेश वडवराव
यांनी केले.
ग्रामीण साहित्यात आपला प्रभावी ठसा उमटवणारे प्रतिभावंत लेखक इंद्रजित पाटील यांचे पंडितराव लाेहाेकरे,सचिव,.शिवाजी शि.प्र.मंडळ,गाैडगाव,ता.बार्शी,अरूण भड सर, चंद्रकांत पाटील,रावसाहेब पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,राकेश गरड यांनी विशेष काैतुक केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा