Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

*आता न्यायालय ही धमकी देऊ लागले आहे --ॲड. असीम सरोदे यांची टीका*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448

                शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर पळून गेलेल्या मंत्र्यांविरोधात मी याचिका दाखल केली होती. मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या व्यक्ती असेच कोणालाही न सांगता पळून जाऊ शकत नाही, नॉट रिचेबल असू शकत नाही. हा त्यांना निवडून देणाऱया नागरिकांचा अपमान आहे, अशा इतर याचिका केल्या. अशा याचिका पॉलिटिकल मोटिव्हेटेड आहेत, असे म्हणत न्यायालयच सांगू लागले की, तुम्ही तुमची याचिका मागे घ्या नाहीतर आम्ही याचिका फेटाळून लावू. आता न्यायालय धमकी देऊ लागले आहे, अशी टीका ॲड. असीम सरोदे यांनी केली.

गोरेगावमधील केशव गोरे स्मारकात निर्भय बनो चळवळीच्या माध्यमातून आज आयोजित करण्यात आलेल्या सभेत ॲड. असीम सरोदे बोलत होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महाविकास आघाडी सशक्त पर्याय

फॅसिझमपासून स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर लोकांनी लढायला तयार राहिले पाहिजे. जे फॅसिस्ट आहेत त्यांचा पराभव करा आणि फॅसिझमविरोधात जो एकमेव सशक्त पर्याय आहे त्या महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले. दरम्यान, अन्नदात्याला छळणारे कोणतेही सरकार सत्तेत कधीही जास्त वेळ टिकून राहत नाही, हा इतिहास आहे, अशी टीका वागळे यांनी मोदी सरकारवर केली.

                 *सौजन्य*

              *कोकण न्यूज*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा