Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

गुन्हेगारी कमी करुन महिलांविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्राधान्य देणार - नवनियुक्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

           - बारामती येथील नवनियुक्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी नुकतीच आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली.

     बारामती विभागाचे नवनियुक्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी नुकतीच आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांची मुंबईला पोलिस उपायुक्तपदी बदली झाली. आनंद भोईटे यांनी संजय जाधव यांच्याकडे बारामतीचा कार्यभार सुपूर्द केला. कायदा व सुव्यवस्था कायम राखणे, स्मार्ट पोलिसिंग करण्यासह गुन्हेगारी कमी करुन महिलांविषयक गुन्हे घडणार नाहीत याची काळजी आपण आपल्या कार्यकाळात घेऊ, अशी ग्वाही संजय जाधव यांनी दिली.

     संजय जाधव यांनी या अगोदर चंद्रपूर व श्रीरामपूर येथे गेली बारा वर्षे अतिरिक्त पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार सांभाळला आहे. चंद्रपूर येथे कार्यरत असताना नक्षली भागात विशेष कामगिरी बजावल्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने त्यांना विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले होते. बारामती विभागातील सर्व 15 पोलिस ठाण्यांना भेटी देऊन तेथील माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांशी थेट संवाद साधून लोकाभिमुख पोलिसिंग कसे करता येईल या वर आपला भर असेल, असे ते म्हणाले.

    आनंद भोईटे यांनीही त्यांच्या कार्यकाळात अनेक जटील गुन्हे उघड करण्यासाठी टीमवर्कने काम केले. त्यांची कारकिर्दही गुन्हेगारी कमी करण्यासाठी महत्वपूर्ण ठरली.

---------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा