*संपादक ---हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448*
मौजे महाळुंग येथील शिवाजी विठठल चव्हाण वय 22 वर्षे यास महाळुंग मिरे रोडलगत असलेल्या स्मशानभुमीचे ठिकाणी त्यास कोणीतरी त्याचे डोकीत मारहाण केल्याने मयत झाला आहे अशी माहिती मिळाल्याने लागलीच अकलुज पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, सहा. पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक बबन साळुंके, महिला पोलीस उपनिरीक्षक महाडीक, डी.बी. पथकातील सुहास क्षिरसागर, प्रविण हिंगणगावकर, नितीन लोखंडी, रणजित जगताप तसेच श्रीपूर दुरक्षेत्राचे एएसआय पानसरे, पोलीस अंमलदार गायकवाड, चंदनशिवे, गुरव असे घटनास्थळी जावून पाहणी केली असता शिवाजी विठ्ठल चव्हाण वय 22 वर्षे याचे प्रेत स्मशानभुमीचे आवारात पालथे स्थितीत पडलेले होते. त्याचे डोकीत धारदार शस्त्राने वार केल्याच्या गंभीर जखमा होत्या. तो रक्ताचे थारोळयात मयत स्थितीत पडलेला होता. बाजुलाच त्याचे उजवे हाताचे बोटाची दोन कांडे तुटून पडलेली होती, लगत त्याचा मोबाईल फोन तसेच रक्ताने भरलेले लोखंडी सत्तूर व एक लोखंडी कत्ती पडलेली होती व चप्पलजोड व मोटार सायकल होती. लोकांची गर्दी झालेली होती. कायदा व सुव्यस्था प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलीसांनी प्रेत उपजिल्हा रुग्णालय अकलुज येथे पोस्ट मार्टेम करीता आणले. तसेच अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, चार्ज अकलुज यांनी घटनास्थळाला भेट दिली. मयताचा भाऊ शंकर विठ्ठल चव्हाण वय 24 वर्षे, व्यवसाय मजुरी, जात - हिंदू मांग, रा. महादेव मंदिरा समोर मिरे रोड, महाळुंग ता. माळशिरस यांनी, दिनांक 02/02/2024 रोजी रात्री 10.00 ते दिनांक 03/02/2024 रोजी पहाटे 05.30 वा. चे दरम्यानचे कालावधीत माझा भाऊ शिवाजी विठ्ठल चव्हाण वय 22 वर्षे यास 1) सोमनाथ महादेव माने, 2) अशोक महादेव माने, 3) पिंटू महादेव माने, 4) दिनेश सोमनाथ माने, 5) प्रदिप मधुकर चव्हाण सर्व रा. महाळुंग ता. माळशिरस यांनी संगणमत करुन महाळुंग गावातील स्मशानभुमीत बोलावून घेवून अशोक माने याचे मुलगी सोबत अनैतिक संबंध आहेत असा संशय घेवून त्या संशयावरुनच त्यांनी मिळून भाऊ शिवाजी यास लोखंडी सत्तूर व कत्ती हत्याराने डोकीत वार करुन त्याचा खून केला असल्याचा माझा त्यांचेविरुध्द संशय आहे म्हणून माझी वरील लोकांविरुध्द तक्रार आहे वगैरे म।। ची फिर्याद दिल्याने अकलुज पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 63/2024 भा.द.वि.सं.क. 302, 143, 147, 148, 149, महाराष्ट्र पोलीस अॅक्ट 135, सह अनुसुचीत जाती आणि अनुसूचीत जमाती अत्यचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे सुधारीत अधिनियम 2015 चे कायदा कलम 3(2)(अ) प्रमाणे दिनांक 03/02/2024 रोजी गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, चार्ज अकलूज विभाग, पोलीस निरीक्षक भानुदास आर. निंभोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकाने तात्काळ माहिती काढून आरोपींचा शोध घेवून शिताफीने सर्व आरोपींचा ताब्यात घेतले असून गुन्हयाचा पुढील तपास अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, चार्ज अकलुज हे करीत आहेत.
पोलीस निरीक्षक,
अकलुज पोलीस ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा