*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारूळ ता.तुळजापूर येथे स्वयंशासन दिन व राष्ट्रीय विज्ञान दिवस निमित्त डॉक्टर सी व्ही रामन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. याप्रसंगी आजच्या स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक श्रावणी यावलकर, उपमुख्याध्यापक शेख यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन करून अध्यापनाचे काम केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहेश्वरी ठोंबरे हिने केले.सर्व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी दिवसभर शाळा चालवून अध्यापनाचे कार्य केले. शिक्षक म्हणून भूमिका बजावताना किती अडचणी येतात आज हे या विद्यार्थ्यांना आजच्या या कार्यक्रमांमधून समजले.याप्रसंगी शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक लोखंडे सर ,सारणे सर, मुलानी सर, पवार सर, राजगुरू मॅडम, मोरे मॅडम, जाधव मॅडम हे सर्व उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा