Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

*महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या- वतीने साफसफाईसाठी महिला व पुरुष कंत्राट पद्धतीने भरती करून स्वच्छतेला प्राधान्य...*

 


*श्रीपूर---बी.टी.शिवशरण

               महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीच्या माध्यमातून श्रीपूर महाळुंग परिसरातील स्वच्छता साफसफाई करण्यासाठी नगरपंचायतचे वतीने नवीन आठ महिला व आठ पुरुष कंत्राट पध्दतीने घेण्यात आले आहेत त्यामुळे दररोज सर्व परिसर रस्ते स्वच्छ केले जाणार आहेत अशी माहिती*महाळुंग श्रीपूर नगरपंचायत उपनगराध्यक्ष भीमराव रेडे पाटील यांनी दिली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी श्रीपूर परिसरातील साफसफाई स्वच्छता करण्यात आली आहे स्वच्छता केल्यानं श्रीपूर परिसर आज लखलखीत दिसत आहे श्रीपूर परिसरातील गल्ली बोळातील व सार्वजनिक ठिकाणी कचरा उचलण्यासाठी नगरपंचायतचे सफाई कामगार मुकादम शिवा चव्हाण यांच्याशी संपर्क केल्यास ते सफाई कर्मचारी यांना पाठवून साफसफाई करुन घेतील असे सांगण्यात आले





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा