Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निवेदनाची आरोग्य विभागाने घेतली दखल.

 


अकलुज ---प्रतिनिधी

लक्ष्मीकांत कुरुडकर

टाइम्स 45 न्युज मराठी.

           स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पं. स. माळशिरसचे आरोग्य अधिकारी यांना दसुर आरोग्य उपकेंद्रातील सेवक/ सेविका मिळण्याबाबत तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक सावंत यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी गेल्या वेळेस आंदोलन करून आम्हाला तात्पुरती आरोग्य सेविका देऊन फसवणूक केली आहे का? असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना करून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर लगेच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला व माळशिरस तालुक्यातील उपकेंद्र जास्त आहेत व आरोग्य सेवक कमी असल्यामुळे आम्हाला अडचण निर्माण होत आहे . आम्ही यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला आहे त्यामुळे आरोग्य सेवक उपलब्ध होताच तुम्हाला दिला जाईल असे सांगण्यात आले परंतु तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आरोग्य विभाग व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा होऊन आठवड्यातील दोन दिवस आरोग्य सेविका उपलब्ध करून देतो अशा आशियाचे लेखी पत्र आरोग्य विभागाने दिले असल्याने आंदोलन करण्याच्या पवित्र असलेले कार्यकर्ते शांत झाले.



     यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते मगन काळे ,शिवराम कांबळे , दादासाहेब काळे, राजाभाऊ खरात यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा