संपादक ---हुसेन मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो.9730 867 448
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील ज्येष्ठ विधीज्ञ - ॲड. एम जी तांबोळी याना जर्मनी येथील विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन त्यांना नुकतेच सन्मानित केले आहे त्यांना जर्मनीत डॉक्टरेट पदवी प्रधान करून सन्मानित केल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे
. संपूर्ण महाराष्ट्र मधील विविध न्यायालयात व मुबई दिल्ली येथील वरिष्ठ न्यायालयात आपल्या कामाची चुणुक दाखविणारे ॲड.एम . जी.तांबोळी यांनी अत्यंत गरिबीतून आपले शिक्षण पूर्ण करून वकिली पदवी मिळवली ,याच बरोबर सामाजिक कार्यातून आपल्या समाजाची प्रगती करण्याचा प्रयत्न केला आहे तर मुस्लिम समाजातील गरीब मुलांचे शिक्षण व विवाह लावून देणे अशा अनेक सामाजिक कार्याचा सातत्याने प्रयत्न करून सर्व सामान्य पीडित, गरीब ,मुस्लिम समाजास न्याय मिळवून देण्या पर्यंतचा प्रवास हा कौतुकास्पद आहे त्यांनी जवळपास 45.वर्षे वकिली केली असून समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी ही दिल्ली येथील एका सामाजिक संघटनेने त्याचे कार्याची दखल घेऊन त्यांना "डाॕ. बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार "देऊन सन्मानित केले आहे तर दिल्ली येथील एका सामाजिक संघटनेने त्याची मानवी हक्क संघटनेची केंद्रीय उपाध्यक्ष म्हणून निवड केली आहे त्याच्या या कार्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे ठीक ठिकाणी विविध संघटना याचे वतीने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे
*ॲड.एम.जी.तांबोळी यांना "डाॕक्टरेट पदवी" प्राप्त झाल्याबद्दल -टाइम्स 45 न्युज मराठी च्या वतीने हर्दिक हर्दिक आभिनंदन*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा