*श्रीपूर---बी.टी.शिवशरण..
पुढल्या महिन्यात लोकसभेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर होणार आहे माढा लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार असावा यासाठी सोशल मीडिया स्थानिक वर्तमानपत्रात राजकीय सामाजिक चर्चांना उधाण आले आहे पुर्वी म्हणजे कांग्रेस च्या काळात पंढरपूर लोकसभा मतदारसंघात कांग्रेस पक्षाने दगड जरी उभा केला तर तो निवडून येणार असा ठाम विश्वास होता कारण लोकसभा मतदारसंघ हा मोठा होता त्यात कांग्रेस पक्षाचे वर्चस्व असायचे त्यावेळी पंढरपूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव होता त्या मतदारसंघातील सलग सात वेळा निवडून येण्याचा विक्रम दिवंगत खासदार संदीपान थोरात यांनी केला होता त्यांच्या सततच्या विजयाची दखल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतली होती त्यांनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दोन वेळा पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व केले आहे मधल्या काळात पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे विभाजन झाले व माढा लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आला माढा लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व एक वेळ शरद पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले त्यांनंतर विद्यमान खासदार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नेतृत्व केले सामाजिक राजकीय परंपरेचा व विकासात्मक तौलनीक दृष्ट्या विचार केला तर विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सपशेल नापास झाले आहेत अशी एकंदरीत परिस्थिती आहे गेल्या साडेचार वर्षात त्यांनी या मतदारसंघात मतदारांशी संपर्क ठेवला नाही विकासाची कामे केली नाहीत गटातटाचे राजकारण करुन आपल्या खुज्या नेतृत्वाची झलक दाखवली आहे त्यांनी कधी विरोधकांच्या गळ्यात गळे घातले तर कधी स्व पक्षीय नेत्यांना कार्यकर्त्यांना भेट नाकारली त्यांचे कामकाज गल्लीतील व ग्रामपंचायतीच्या सदस्यांना शोभेल असे आहे वास्तविक पाहता देशात भाजपचे सरकार स्थीर व मजबूत असताना या मतदारसंघाचा काया पालट होणं अपेक्षित होते पण खासदारांना दुरदृष्टी नाही त्यांचे असं झाले बेगांना शादी में अब्दुल्ला दिवाना शेतकरी कष्टकरी सामान्य जनता लहान उद्योजक व्यापारी मागासवर्गीयांच्या प्रश्नांची जाण नसल्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खासदार या पदाचा उपमर्द केला आहे असे म्हटले तर यत्किंचितही वावगे होणार नाही त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात त्यांनी पुन्हा उमेदवारी मागणे म्हणजे बैल केला आणि झोपी गेला असो त्यांच्या नेतृत्वाची कर्तृत्वाची सामाजिक राजकीय कार्याची उंची मोठी नाही त्यामुळे त्यांच्या वर काय आणि किती बोलावे किंवा लिहावे हे उचित होणार नाही माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव या मतदारसंघात प्रत्येक गावात शहरात खेड्यात वस्त्या वाडयांवर आदराने घेतले जाते याला कारण मोहिते पाटील घराणे यांनी सोलापूर जिल्ह्यात जो विकासाचा आलेख उंचावला आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाला कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटते आपल्या भागाचा विकास पाहिजे असेल तर मोहिते पाटील घराण्यातील तरुण तडफदार क्रियाशील व सतत कार्यरत असणारे सर्वांचे हक्काचे व आपला माणूस म्हणून धैर्यशील मोहिते पाटील हे आता माढा लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून निवडून दिले पाहिजेत मोहिते पाटील यांची सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक शैक्षणिक वैचारिक कृषी विषयक नैतिक जबाबदारी व बांधीलकी जपली आहे केवळ त्यांनी राजकारण सत्ताकारण व नेतृत्व केलं नाही तर समाजकारणात अगोदर पाया भक्कम घातला आहे निव्वळ सत्तेसाठी त्यांचे राजकारण समाजकारण नाही विकास समाजकारण काय असते याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अकलूज चे मोहिते पाटील घराणे आहे शुन्यातून विश्व निर्माण करण्यासाठी ते दिलेल्या शब्दाला पक्के असतात केवळ खासदारकी मिरवण्यासाठी त्यांची उमेदवारी नाही तर या मतदारसंघात विकासाची गंगा तळागाळातील सर्वसामान्य व बहुजनांच्या दारापर्यंत आणणे हे त्यांचे उद्दिष्ट साध्य आहे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात धमक आहे हाती घेऊ ते तडीस नेऊ हा त्यांचा स्थायीभाव आहे मोहिते पाटील यांनी सुमारे सत्तर वर्षांपूर्वी माळशिरस तालुक्यात जो विकासाचा पाया घातला तो सोलापूर जिल्ह्यातील भविष्याची गुरुकिल्ली ठरली अकलूज ही सोलापूर जिल्ह्यातील राजकारण सत्ताकारण व नेते कार्यकर्ते घडवण्याची कार्यशाळा असल्याने शिव रत्न बंगला माढा लोकसभा मतदारसंघांची राजधानी आहे हे विसरून चालणार नाही इथे अशी परिस्थिती आहे मोहिते पाटील हाच आमचा पक्ष मोहिते पाटील हेच आमचे सर्वस्व त्यामुळे मोहिते पाटील ठरवतील ती पुर्व दिशा मोहिते पाटील यांचे साम्राज्य वैचारिक परिवर्तनवादी चौफेर आहे कार्यकर्त्यांचा अभेद्य पाठिंबा मोठा जनाधार असल्याने माढा लोकसभा मतदारसंघांत भाजपचा उमेदवार निवडून आल्यात जमा आहे हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची आवश्यकता आहे अशातला भाग नाही विद्यमान खासदार हे निष्क्रिय व जनतेच्या मनातून उतरलेले वेळकाढू खासदार म्हणून त्यांची नोंद भाजपने घेतली आहे अकलूज पॅटर्न महाराष्ट्र नव्हे तर देशात चर्चेत राहिला आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी म्हणजे आता पर्यंत च्या खासदारांचे निवडणुन येण्याचे मताधिक्य वाढवणे आहे भाजपचा विकासासाचा रथ व विजयांची परंपरा धैर्यशील मोहिते पाटील यांचे रुपाने माढयात कितीचे मताधिक्य मिळवणार याची उत्सुकता सर्वत्र लागून राहिली आहे अकलूज चे मोहिते पाटील घराणे यांना विजयाचे तोरण बांधण्याची सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक ऐतिहासिक परंपरा आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा