Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

*पुण्यात "पंतप्रधान नरेन्द्र मोदी" यांचा पुतळा जाळल्या प्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यां विरुध्द गुन्हा दाखल.*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

*मो.9730 867 448*

           पुणे :--पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. काँग्रेस भवन येथे सोमवारी सायंकाळी युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

दिल्ली-हरयाणा सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असताना एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते सोमवारी सायंकाळी जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकात जमले. कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे बंदोबस्तास असलेले डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस, उपनिरीक्षक महेश भोसले, दत्तात्रय सावंत यांनी कार्यकर्त्यांना रोखले. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना डेक्कन पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते ऋषिकेश उर्फ बंटी बाबा शेळके, प्रथमेश विकास आबनावे, एहसान अहमद खान, मुरलीधर सिद्धाराम बुधरामस, राहुल दुर्योधन शिरसाट यांच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती डेक्कन पोलिसांनी दिली.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा