इंदापूर तालुका----- प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल -8378081147
*
- जल आपल्या जीवनाचा मुलभूत आधार आहे. परमात्म्याने आपल्याला जी स्वच्छ व सुंदर सृष्टी बहाल केली आहे. तिची देखभाल करणे आपले कर्तव्य असून त्याचे अमृताप्रमाणे रक्षण करावे असे प्रतिपादन संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांनी केले.
सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली‘प्रोजेक्ट अमृत' अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या द्वितिय टप्प्याचा शुभारंभ यमुना नदीचा छठ घाट, आई. टी. ओ, दिल्ली येथे करण्यात आला. त्यावेळी त्यांनी वरील उद्गार काढले.
या अनुषंगाने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे प्रोजेक्ट अमृत अंतर्गत “स्वच्छ जल – स्वच्छ मन" ही परियोजना निरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील संगम घाटासह परिसरात राबविण्यात आली. रविवारी तीन तासाच्या सफाईत १५ ट्रॅक्टर ट्रॉली कचरा गोळा करण्यात आल्याचे सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी सांगितले.
स्वच्छता अभियानात अंथूर्णेचे संयोजक महादेव शिंदे, नीरा नरसिंहपूर ब्रांचचे मुखी प्रकाश काळे यांच्यासह गावचे सरपंच प्रतिनिधी नितीन सरवदे, उपसरपंच गुरुदत्त गोसावी, माजी सरपंच जगदीश सुतार, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ राऊत तसेच मंदिराचे विश्वस्त अभय वांकर यांनी विशेष सहभाग घेतला.
सदरचे अभियान सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. अभियानात इंदापूर सह बारामती परिसरातील निरंकारी सेवादल अधिकारी, सेवादल, सेवादल भगिनी, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सदस्य तसेच अन्य निरंकारी भक्तगणांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. निरंकारी मिशनने राबविलेल्या उपक्रमाचे समस्त ग्रामस्थ, संबंधित सरकारी अधिकारी, प्रतिष्ठित नागरीक व जन सामान्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा