Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४

*भाजपा हे जाती आणि धर्मामध्ये तेढ निर्माण करत आहे ------आदित्य ठाकरे*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी

*मो.9730 867 448

                    पुणे :--राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप होताच वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मात्र मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपानंतर सावध भूमिका घेतली आहे. आधी सर्व चित्र स्पष्ट होऊ द्या मग मी यावर बोलेल असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. राज्यात भाजपा हे जाती आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करत आहे. शेतकरी आणि आरक्षण मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या समाजविरोधात बळाचा वापर केला जातो आहे. असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, मनोज जरांगे यांच्यावर काही बोलणार नाही. सर्व चित्र स्पष्ट होऊ द्या. परंतु, अंतरवली सराटीत लाठीचार्ज झाला, त्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले की मुख्यमंत्र्यांनी? याचं उत्तर या सरकारने दिलं पाहिजे. लोक न्याय हक्कांसाठी लढत आहेत. त्यांच्या विरोधात बळाचा वापर केला जात आहे. शेतकरी आणि आरक्षणासाठी लढणाऱ्या समाजाच ऐकून घ्या, चर्चा करा. अस न करता हे सरकार हुकुशाही करत आहे. पुढे ते म्हणाले, जातीत आणि धर्मांत भांडणं लावायचं काम भाजप करत आहे. हे विष पेरून काही होणार नाही. राजकारणाचा चोथा झाला आहे. असंही आदित्य ठाकरे म्हणाले.


             *सौजन्य*

           *कोकण न्यूज*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा