*अकलुज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज गांधी चौक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने गांधी चौक ते अशोका चौक रस्ता दुरुस्तीसाठी रस्त्यामध्ये झोपा काढू आंदोलन करण्यात आले. या रस्त्या संदर्भात अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग, अकलूज,नॅशनल हायवे यांच्याकडे तक्रारी,पत्रव्यवहार केले असुन परंतु यावर कोणताही पर्याय मार्ग काढण्यात आला नाही.त्यामुळे आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्यात आले.सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ता दुरूस्तीचे लेखी आश्वासन घेऊन तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे युवा नेते व मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस सज्जन लोखंडे, युवक तालुका उपाध्यक्ष जाकिर शेख,अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,पुणे जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास जगताप,अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस साजिद भाई सय्यद,विशाल मोहिते,युवा नेते सोमनाथ भाऊ परदेशी,तसेच मैत्री प्रतिष्ठान महिला जिल्हाध्यक्ष नीता सुळे,तालुका उपाध्यक्ष शंकर मस्के,फारुख शेख, अविनाश सोनावणे,प्रकाश सोनवणे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा