*अकलुज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
संत निरंकारी मिशनच्या वतीने सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या संकल्पनेतून भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमृत जल अभियानांतर्गत संत निरंकारी मंडळ शाखा अकलूज यांच्या वतीने शिवसुष्टी किल्ला परिसरातील नदीपत्रात स्वच्छता करण्यात आली.सद्गुरु बाबा हरदेवसिंग जी महाराज यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने निरंकारी मिशनच्या माध्यमातून देशभर अमृत जल अभियानांतर्गत सार्वजनिक पानवट्याच्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलेे.एकाच वेळी सर्वत्र अभियान राबवण्यात आले. पानवड्याच्या परिसरातील स्वच्छता करून पाणी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न व पाणी व त्याचे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे या उद्देशाने स्वच्छ जल स्वच्छ मन हा नारा देत अमृत जल अभियान राबवण्यात आले.
अकलूज येथील शिवसुष्टी किल्ला परिसरातील निरा नदीच्या पात्रात गवत,प्लास्टिकच्या पिशव्या, काटेरी झाडे झुडपे, इत्यादी कचरा उचलून स्वच्छता करण्यात आली.यावेळी अकलूज व पिलीव शाखेतील बहुसंख्य निरंकारी अनुयायी व सेवादल सहभाग घेतला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा