*अकलुज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
अकलूजची लावणी सम्राज्ञी प्रमिला लोदगेकर सूर्यवंशी यांना नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या नाट्यसंगीत अकॅडमीचा "उस्ताद बिस्मिल्ला खान युवा रत्न पुरस्कार" जाहीर झाल्याचे भारत सरकारच्या प्रसिद्धी विभागाकडून जाहीर करण्यात आले.या प्रसिध्दी पत्रकात सण २०२२- २३ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.त्यामध्ये प्रमिला लोदगेकर यांनी लावणी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
लावणी सम्राज्ञी प्रमिला लोदगेकर यांनी अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळवून हॅट्रिक केलेली आहे तसेच अकलूज लावणी स्पर्धेचा मानाचा सहकार महर्षी शंकर राव मोहिते पाटील लावणी कलावंत पुरस्कार याचबरोबर गोवा येथे भास्कर भूषण यांचा प्राईड ऑफ इंडिया तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लावणी कलावंत पुरस्कार अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ही मानाचा पुरस्कार मिळाला याचबरोबर अनेक पुरस्काराने प्रमिलाला लोदगेकर या सन्मानित झाले आहेत तसेच त्यांनी भारत सरकार च्या वतीने चीन व दुबई येथे महाराष्ट्राची लोक कला या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राची पारंपारिक लावणी सादर केली होती आजही लावणी प्रशिक्षक व नवीन कलावंतांना मार्गदर्शन करण्याचे काम त्या करीत आहेत पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व तर त्यांचे अभिनंदन होत आहे पुरस्काराचे वितरण नवी दिल्ली येथे होणार आहे प्रमिला लोदगेकर यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अकलूज लावणी स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा