*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो.9730 867 448
'
मुंबई 10 फेब्रुवारी:* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना नाशिक येथील कार्यालयात अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे पत्र मिळाले आहे. या घटनेनंतर भुजबळांच्या समर्थकांकडून त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी केली जात आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. गेल्या महिन्यात भुजबळ यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या आपल्याच सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता. कुणबी हे ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळण्यास पात्र असल्याने मराठा समाजाला ओबीसी कोट्यात मागच्या दाराने प्रवेश देण्याचा सरकारचा निर्णय असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.
कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करणारी मसुदा अधिसूचना काढल्यानंतर एकनाथ शिंदे सरकारवर भुजबळांनी हल्ला चढवला.
“मी गेल्या ३५ वर्षांपासून ओबीसींसाठी काम करत आहे. आज मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश केला जात आहे. उद्या पटेल, जाट आणि गुर्जरांचाही समावेश होईल. अशा प्रकारे कोणताही समाज ओबीसी प्रवर्गात प्रवेश करेल. लोकशाहीत जी अपेक्षा करता येईल, त्या पद्धतीने आम्ही लढू. मराठा मागास नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे,” असे भुजबळ म्हणाले.
*सौजन्य*
*कोकण न्यूज*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा